कुठंतरी दिलासा मिळेल असं असताना साखर झोपेत संकट कोसळलं, भल्या पहाटे बळीराजाच्या स्वप्नांना अवकळी धक्का

| Updated on: Apr 27, 2023 | 12:52 PM

शेतीत राब राबत येणाऱ्या पैशांवर बळीराजा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतमालाला जिवापाड जपत असतो. मात्र, नैसर्गिक संकट आल्यास स्वप्नांचा अक्षरशः चिखल होऊन जातो आहे. पुन्हा एकदा असेच संकट शेतकऱ्यांवर आले आहे.

कुठंतरी दिलासा मिळेल असं असताना साखर झोपेत संकट कोसळलं, भल्या पहाटे बळीराजाच्या स्वप्नांना अवकळी धक्का
Image Credit source: TV9 Network
Follow us on

लासलगाव, नाशिक : गेल्या महिन्यापासून राज्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असतांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असे चित्र असताना असताना आता पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसू लागला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिल्यानुसार मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पाऊस पडू लागला आहे. येवला तालुक्यात वातावरणात बदल होत असल्याने आकाशात ढगांची गर्दी होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी कांदा उत्पादकाची धावपळ पाहायला मिळत आहे.

कांद्याला बाजार भाव नसल्याने शेतातून काढलेल्या कांद्याची प्रतवारी करत चाळीमध्ये (शेतातील गोडाऊन मध्ये) सुरक्षित ठेवण्यासाठी कांदा उत्पादकांची लगबग सुरु आहे. यावेळी कांद्याला बाजार भाव नसल्याने शेतकरी कांदा साठवण्यावरच भर देत आहे.

यंदाच्या वर्षी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च झाला आहे. त्यामध्ये ३० ते ४० हजार निघणे मुश्कील झाले आहे. यामुळे लाल कांद्याप्रमाणे उन्हाळी कांद्याला ही अनुदान द्यायला हवे अशी मागणी होऊ लागली आहे. कुटुंबासमोर असलेल्या समस्यांचा पाढा वाचला जात आहे.

हे सुद्धा वाचा

शेती पिकाचे झालेले नुकसान, सध्या असलेला बाजार भाव पाहता हातात पैसा नसल्याने दोन पुतण्यांचे लग्न करावे कसे, शेतकर्यांच्या मुलांना मुली देत नसल्याचे गाऱ्हाणे शेतकरी अशोक गाडे यांनी मांडले आहे. त्यामुळे आलेले संकट सांगत असतांना त्यांचा कंठ दाटून येत आहे.

लाल कांद्याला अनुदान जाहीर करून काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे चित्र आहे. झालेला उत्पादन खर्च निघणार नसला तरी पुढील पिकासाठी लागणाऱ्या भंडावलाला मदत होणार आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याला भाव मिळेल अशी शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकरी कांद्याची साठवण करत आहे.

काही ठिकाणी पहाटेच्या वेळेला पाऊस आला आहे. त्यामध्ये शेतकरी साखर झोपेत असताना कांद्यातून दोन पैसे मिळेल असे स्वप्न पाहत असताना अवकळी फेरा पुन्हा आल्याने स्वप्नांचा अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अनेक शेतकऱ्यांचे पीक शेतातच भिजून गेले आहे.

दरम्यान आता कसंबसं वाचवलेले पीक तरी राहुडे देरे बाबा अशी आर्त हाक बळीराजा देऊ लागला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळीचा फेरा आल्याचे पाहायला मिळत आहे.