Washim : कृषी सप्ताहातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची ओळख अन् नवीन पीक वाणांचा प्रसार
तंत्रज्ञानाच्या वापराने शेती व्यवसायाचे स्वरुप बदलत आहे. शिवाय ते आता सर्वांच्याच लक्षात येत असून त्याला मूर्त स्वरुप देणे गरजेचे आहे. त्यामुळेच कृषी सप्ताहाचे आयोजन करुन याबाबत जनजागृती आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तंत्रज्ञानाची माहिती आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारा हा पहिलाच सप्ताह असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाशिम : शेतकऱ्यांचे (Farming Production) उत्पादन वाढावे आणि कृषि विद्यापीठाचा उद्देश साध्य व्हावा त्याअनुशंगाने करडा प्रक्षेत्रावर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या वापाराने उत्पादनात वाढ होत आहे पण (Technology) तंत्रज्ञान वापरायचे कसे याबाबतीत शेतकऱ्यांना माहिती असणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केला तर कष्ट कमी आणि उत्पादन जास्त होते हा अनुभव (Agricultural Department) कृषी विभागाचा आहे. त्यामुळे मंडळाच्या ठिकाणी कृषी सप्ताहाचे आयोजन करुन त्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा यामुळे करडा प्रक्षेत्रावर हा सप्ताह पार पडत आहे. तंत्रज्ञानाबरोबरच खरिपातील पीक वाणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे देखील उद्देश ठेऊन राष्ट्रीय कृषी संशोधन विभाग आणि कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून हा सप्ताह पार पडत आहे. त्याचा लाभ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना देखील होत आहे.
तंत्राची प्रत्यक्ष चाचणी प्रयोग
तंत्रज्ञानाच्या वापराने शेती व्यवसायाचे स्वरुप बदलत आहे. शिवाय ते आता सर्वांच्याच लक्षात येत असून त्याला मूर्त स्वरुप देणे गरजेचे आहे. त्यामुळेच कृषी सप्ताहाचे आयोजन करुन याबाबत जनजागृती आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तंत्रज्ञानाची माहिती आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारा हा पहिलाच सप्ताह असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन बाबींची माहिती होणार आहे. 18 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान कृषी तंत्र व प्रत्यक्ष चाचणी प्रयोगाचे निष्कर्ष सप्ताह पार पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून याला सुरवात झाली असून शेतकरी नवनवीन बाबी जाणून घेत आहेत.
पीक प्रात्याक्षिकातून नवीन वाणांचा प्रसार
कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवीन संशोधन करुन उत्पादनात वाढ करावी हाच खरा उद्देश आहे. त्याअनुशंगाने कृषी विद्यापीठांनी खरीप हंगामातील तूर, उडीद, मूग, सोयाबीन, गहू यामधील नवीन वाणांचा शोध घेतला आहे. त्या वाणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न या सप्ताहातून केला जात आहे. ग्रामीण भागात अशाप्रकारे कृषी सप्ताहातून जनजागृती केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील समाधान आहे. सलग सात दिवस असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याने शेतकऱ्यांच्या समस्याही मार्गी लागणार आहेत.
कृषी तज्ञांचे मार्गदर्शन
कृषी सप्तहातून केवळ तंत्रज्ञानाची माहिती एवढाच उद्देश नाही तर पीक पध्दतीतून उत्पादन कसे वाढावायचे याचेही मार्गदर्शन केले जात आहे. त्यामध्ये खरीप आणि रब्बी हंगामात पीक पेरणी पद्धत, उत्पादन वाढीच्या अनुशंगाने महत्वाची असणारी पद्धतीचे थेट प्रात्याक्षिक करुन दाखवले जात आहे. त्यामुळे समस्याही दूर होत आहेत. या कृषी सप्ताहात कृषितज्ञ कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.आर.एल.काळे यांचे मार्गदर्शन होत आहे.