Latur Market : सोयाबीनची साठवणूक पडली महागात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात दराचे चित्र बदलले

केंद्र सरकारच्या शेतीमाल आयात धोरणाचा शेतकऱ्यांना कायम फटकाच बसलेला आहे. यापुर्वीही तुर आयातीची मुदत वाढविल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दर बाजार पेठेत मिळत आहे. तर आता सोयाबीनच्या दरातही झपाट्याने घसरण सुरु आहे. गत आठवड्यात सोयाबीन 7 हजार 200 रुपयांवर होते तर आता 6 हजार 820 रुपये क्विंटलवर दर आले आहेत.

Latur Market : सोयाबीनची साठवणूक पडली महागात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात दराचे चित्र बदलले
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 4:19 PM

लातूर : हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना (Soybean Rate) सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता पण आता ती आशा धुसर होताना दिसत आहे. एवढेच नाही (Soybean Stock) साठवणूक केल्याचा पश्चाताप होईल असेच सध्या सोयबीनचे दर आहेत. 5 महिन्यात प्रथमच सोयाबीन हे 7 हजाराच्या खाली आले आहे. नोव्हेंबरपासून 7 हजार रुपये क्विंटल असेच दर राहिले आहेत. पण गेल्या 8 दिवसांपासून चित्र बदलले आहे. (Central Government) केंद्र सरकारने सोयापेंडची आयात केल्याने सोयाबीनची मागणी घटली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण सुरु झाली आहे. आता उन्हाळी हंगामातील सोयाबीनची काढणी सुरु होतानाच झालेली दरातील घट शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय राहणार आहे. त्यामुळे दरात लागलीच सुधारणा झाली नाही तर मात्र, नुकसान अटळ आहे.

केंद्र सराकारकडून सोयापेंडची आयात

केंद्र सरकारच्या शेतीमाल आयात धोरणाचा शेतकऱ्यांना कायम फटकाच बसलेला आहे. यापुर्वीही तुर आयातीची मुदत वाढविल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दर बाजार पेठेत मिळत आहे. तर आता सोयाबीनच्या दरातही झपाट्याने घसरण सुरु आहे. गत आठवड्यात सोयाबीन 7 हजार 200 रुपयांवर होते तर आता 6 हजार 820 रुपये क्विंटलवर दर आले आहेत. त्यामुळे एवढ्या दिवस साठवणूक करुन उपयोग काय अशी स्थिती झाली आहे. शिवाय प्रक्रिया उद्योजकांनी लागेल त्यानुसारच सोयाबीनची खरेदी करुन सोयापेंडचे उत्पादन घेतले होते. पण आता दर घसरल्याने प्रक्रिया उद्योजकांनी सोयाबीन खरेदीलाच ब्रेक लावले आहे.

उन्हाळी सोयाबीनची धास्ती

शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनवर भर दिला होता. शिवाय पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने उन्हाळी सोयाबीनमध्ये वाढ होणार आहे. उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाल्यास दरात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यंतरी 7 हजार 600 दर असताना ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली त्यांचे चांगले साधले आहे.

हे सुद्धा वाचा

शेतीमालाच्या दरातच घसरण

सोयाबीनच्या दरातच घसरण झाली असे नाही तर तूर आणि हरभऱ्याचेही दर घसरले आहेत. त्यामुळे विक्री की साठवणूक हा प्रश्न पुन्हा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तुरीचे दर 6 हजार तर खुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 असा दर झाला आहे. त्यामुळे सोयाबीन विक्री शिवाय पर्याय नाही तर दुसरीकडे मका आणि तुरीची खरेदी केंद्रावर विक्री हाच पर्याय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.