या राज्यात झेंडूच्या फुलाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार देतंय अनुदान, जाणून घ्या संपूर्ण माहिती
झेंडूच्या फुलांची शेती करणं म्हणजे, दोन महिन्यात हे पीक तोडणीला येतं. झेंडूची शेती शेतकरी वर्षातून तीनवेळा करता येते. झेंडूच्या फुलाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार २८ हजार रुपये मिळणार असल्याचं एका राज्याने जाहीर केलं आहे.
नवी दिल्ली : सध्या शेतीत अनेक बदल झाल्याचे आपण ऐकतोय आणि व्हिडीओच्या (farmer cultivation video) माध्यमातून पाहतोय. देशात अनेक शेतकरी पारंपारिक शेती करीत नसल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या शेतीत फायदा आहे, अशा पद्धतीची शेती शेतकरी करीत आहेत. विशेष म्हणजे कमी कालावधीत अधिक पैसे देणाऱ्या पिकाकडे लोकांचा अधिक कल असल्याचं पाहायला मिळतंय. झेंडूच्या फुलाची लागवड (Marigold Cultivation) ही अत्यंत कमी कालावधीत होते. दोन महिन्यात फुलांची तोडणी होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिक कल त्याकडं आहे. बिहार सरकारने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ७० टक्के अनुदान (government subsidy) देण्याचा निर्णय घेतला आहे.
फुलांच्या लागवडीसाठी 70% अनुदान
बिहार हे राज्य शेतकऱ्यांसाठी एक एकात्मिक फलोत्पादन विकास मिशन योजना राबविते. त्यातून झेंडूच्या फुलांच्या लागवडीसाठी 70% अनुदान देत आहे. विशेष बिहार सरकार तिथल्या शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर किंमत 40 हजार देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी http://horticulture.bihar.gov.in वर अर्ज करू शकतात.
४५ ते ६० दिवसांत झेंडूची फुल तोडणी
झेंडूच्या फुलांची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. खास गोष्ट म्हणजे ती ४५ ते ६० दिवसांत झेंडूची फुल तोडणीसाठी येतात. त्याचबरोबर झेंडूचं पीक बारा महिने घेतलं जातं. वर्षातून शेतकरी तीन पीकं घेत आहेत. देशातल्या चांगल्या सणात त्याची मागणी अधिक असल्यामुळे त्या पिकातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो.
कमी खर्चात अधिक फायदा
शेतकरी दिलेल्या माहितीनुसार समजा झेंडूच्या लागवडीला ४० हजार खर्च आला तर, त्यातून २ ते ४ लाख रुपयांचा फायदा मिळतो. त्यामुळं अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पारंपरिक पिकांपेक्षा हा एक चांगला पर्याय आहे. अधिक शेतकरी झेंडूच्या फुलांची लागवड करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. झेंडूच्या फुलाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे रोपांना रोगराई होण्याची शक्यता अधिक कमी असते. अशा परिस्थितीत इतर पिकांच्या तुलनेत त्याची देखभाल करण्यात कोणतीही अडचण येत नाही. विशेष म्हणजे झेंडूच्या फुलांची लागवड केल्याने जमिनीत होणारे अनेक रोग देखील बरे होतात.