VIDEO | बैलानं हे काय केलं? पत्र्याच्या डब्यात तोंड घुसवलं अन् मालेगावच्या डॉक्टरांसह अख्खं शहर डोक्यावर घेतलं!

मालेगाव शहरातील गल्ली बोळात मोकाट जनावरांची संख्या काही कमी नाही. शहरातील वर्धमान नगरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एक बैल चरत होता. अचानक त्याचे तोंड हे पत्र्याच्या डब्यात अडकले. खालचा जबडा डब्यात फसल्याने बैल सैरभैर पळत सुटला होता. काहीही केल्याने जबड्यातून पत्र्याचा डबा काही निघाला नाही.

VIDEO | बैलानं हे काय केलं? पत्र्याच्या डब्यात तोंड घुसवलं अन् मालेगावच्या डॉक्टरांसह अख्खं शहर डोक्यावर घेतलं!
मालेगाव शहरातील वर्धमान नगरात बैलाच्या तोंडात पत्र्याचा डबा अडकल्याची घटना घडली.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 11:01 AM

मालेगाव : शहारात (Stray Animals) मोकाट जनावरांची काही कमी नसते. शिवाय ही मोकाट असली तरी राखणीला असलेल्या जनावरांपेक्षा शिस्तीची असतात. पण या मोकाट जनावराच्या बाबतीत काही भलतेच घडले तर काय होऊ शकते हे (Malegaon) मालेगावकरांनी चांगलेच अनुभवले. शहरातील वर्धामान नगरात वावरणाऱ्या मोकाट बैलाचे तोंड एका पत्र्याच्या डब्यात अडकले. मग काय..कशाचा विचार न करता हा बैल उधळलाच की..एरवी अशा घटना मोकळ्या शेत शिवारात घडतात. पण मालेगाव शहरातच हा प्रसंग घडल्याने अनेकांनी आपला जीव मूठीत घेऊन पळ काढण्यास सुरवात केली. अखेर स्थानिकांनी आणि (Veterinary Officer) पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बैलांच्या तोंडात अडकलेला पत्र्याचा डबा काढला. यानंतरच वर्धमान नगरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

नेमकं घडल काय ?

मालेगाव शहरातील गल्ली बोळात मोकाट जनावरांची संख्या काही कमी नाही. शहरातील वर्धमान नगरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एक बैल चरत होता. अचानक त्याचे तोंड हे पत्र्याच्या डब्यात अडकले. खालचा जबडा डब्यात फसल्याने बैल सैरभैर पळत सुटला होता. काहीही केल्याने जबड्यातून पत्र्याचा डबा काही निघाला नाही. सैरभैर पळून बैल दमला आणि झाडाखाली बसला. मात्र, नागरिक जवळ येताच तो पुन्हा धावायला लागयचा.

हे सुद्धा वाचा

गोरक्ष, प्राणीप्रेमींची मदत

बैलाचे तोंड पत्र्याच्या डब्यात अडकल्याने सर्वसामान्य नागरिकांनी तर पळ काढला पण शहरातील गोरक्ष व प्राणी प्रेमींनी मात्र, प्रसांगवधान दाखविले आणि सर्वांनी मिळून या मोकाट बैलाला कासऱ्याच्या मदतीने झाडाखाली बांधले. मात्र, पत्र्याच्या डब्यामुळे बैलाच्या तोंडाला जखम झाली होती. त्यांनी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क करुन बोलावून घेतले.

जखमी बैलावर उपचार अनि सुटका

तोंडात चक्क पत्र्याचा डबा अडकल्याने बैलाला चारा खाणे तर दुरच पण पत्र्यामुळे त्याच्या तोंडाला जखम झाली होती. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी जावेद खाटीक यांना पाचारण केले. त्यांनी जोखीम पत्करून बैलाच्या तोंडात अडकलेला डबा काढून त्या बैलावर उपचार करून त्याला मुक्त सहवासात सोडून दिले. गोरक्ष, प्राणीप्रेमी आणि पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे बैलाची सुटका झाली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.