Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांची उडाली तारांबळ, नेमका प्रकार काय?

| Updated on: May 29, 2024 | 3:38 PM

VIDEO | मंत्रालयात आज अचानक उडाला मोठा गोंधळ, मंत्रालयाच्या सुरक्षाजाळीवर अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मारल्या उड्या, आपल्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आक्रमक आंदोलकांचा आरोप

Follow us on

मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | मुंबई मंत्रालयात आज एकच गोंधळ उडाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर अचानक उड्या घेतल्या. यामुळे पोलिसांची या आंदोलकांना वाचवण्यासाठी एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी करत या आक्रमक झालेल्या आंदोलकांनी थेट मंत्रालयात दाखल होत सुरक्षा जाळीवर उड्या घेत आंदोलन केले. तर धरणग्रस्तांच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. गेल्या 103 दिवसांपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर या सर्व धरणग्रस्तांचं आंदोलन सुरु आहे. पण त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याने त्यांनी आज मंत्रालय गाठलं, आंदोलकांनी आधी मंत्रालयात प्रवेश केला, त्यानंतर जाळीवर चढून निदर्शने करण्यास सुरुवात केली. यावेळी या आंदोलकांना वाचवण्यासाठी पोलिसांकडून एकच धावाधाव सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.