फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय केली पुन्हा टीका?

| Updated on: Sep 13, 2023 | 12:57 PM

VIDEO | हिंगोलीत झोलेल्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांची भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका, उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईत उद्रेक होणार? भाजपनं नेमका काय दिला इशारा?

Follow us on

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३ | हिंगोलीत झोलेल्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख थापाड्या केल्या त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईत उद्रेक होणार? असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय. हिंगोलीतील सभेत याआधी फडतूस, कलंक म्हणालो पण आता थापाड्या म्हणणार नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जळजळीत टीका केली आणि जे बोलायचं नव्हत असं म्हणत ते बोलून गेले. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट इशाराच दिलाय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलाल तर मुंबईत उद्रेक होईल? असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी फडतूस गृहमंत्री आणि नागपूरला लागलेला कलंक अशी खोचक टीका केली होती. मात्र आता नेमकी काय केली टीका बघा स्पेशल रिपोर्ट