मुख्यमंत्री शिंदे यांची मध्यरात्री ‘केईएम’ला भेट अन् नुतनीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरूवात

| Updated on: Aug 23, 2023 | 3:12 PM

केईएम रुग्णालयातील बंद असणाऱ्या सहा बंद वॉर्डवरून मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांनी आदेश दिले आणि सगळं चित्र बदललं आहे. अवघ्या काही तासातच येथील या वार्डांच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे.

Follow us on

मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | ठाण्यातील कळवा रूग्णालयात काही दिवसांपुर्वी २४ एक रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अचानक येथील केइएम रूग्णालयाला भेट दिली होती. तर त्यावेळी त्यांनी येथील उपलब्ध सुविधांबद्दल माहिची घेताना रुग्णालयातील बंद सहा वॉर्डची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्या दिलेल्या आदेशावर आता कारवाई सुरू झाली आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर नुतनीकरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. सध्या सुरू असलेल्या नुतनीकरण वार्डांची क्षमता ही ४० ते ५० रूग्णांची असून ६ वार्डांचे काम पुर्ण होताच २०० ते ३०० रूग्णांची सोय होणार आहे.