राहुल गांधी यांना लोकांचा मिळणारा पाठिंबा पाहून कारवाई केली; सोलापुरात काँग्रेस आक्रमक
येणाऱ्या काळात लोकसभेत भारतीय जनता पार्टीची पीछेहाट होणार आहे. याची चाहूल त्यांना लागली आहे. त्यामुळे विरोधकाचा आवाज कुठेतरी बंद व्हावा. या देशातील लोकशाही संपुष्टात यावी. या देशात हुकूमशाहीचा नवा अध्याय सुरू व्हावा. त्यामुळे कारवाई झाली आहे, असं म्हणत सोलापुरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आहे.
सोलापूर : काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. सोलापुरातही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोलापुरात आंदोलन करण्यात येत आहे. “भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी देशातील नागरिकांची होणारी लूट सर्वांसमोर आणली त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली. राहुल गांधी यांना सर्वसामान्य जनतेचा मिळणारा पाठिंबा बघता अमित शहा आणि नरेंद्र मोदी या जोडगोळीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सर्वसामान्य जनतेचा संसदेत जो खासदार आवाज उठवेल त्यांचा आवाज बंद करण्याचं पाप नरेंद्र मोदी आणि अमित शहा करत आहेत. त्याची पुनरावृत्ती आज झालेली आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली आहे.
Published on: Mar 25, 2023 09:49 AM