हिंगोलीतील कावड यात्रेतून Santosh Bangar यांचा विरोधकांना इशारा; म्हणाले, ‘आमच्या नादाला…’

| Updated on: Aug 28, 2023 | 7:55 PM

VIDEO | हिंगोलीतील कावड यात्रेतून एकनाथ शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी विरोधकांना नेमका काय इशारा दिला? संतोष बांगर यांच्या नेतृत्वात निघालेल्या कावड यात्रेला कालीचरण महाराज यांची उपस्थिती

Follow us on

हिंगोली, २८ ऑगस्ट २०२३ | कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये कळमनुरी विधानसभेतील चिंचाळेश्वर महादेव मंदिरातून निघालेली कावड यात्रा सायंकाळी सहा वाजता हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात पोहोचली. भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने क्रेनला 51 फुटी हार लावून क्रेनच्या सहाय्याने कावड यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप आमदार तानाजी मुटकुळे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, खासदार हेमंत पाटील संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्यासह हजारो शिवभक्तांची उपस्थिती होती. तर संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये कळमनुरी विधानसभेतील चिंचाळेश्वर महादेव मंदिरातून निघालेल्या कावड यात्रेला कालीचरण महाराज यांची उपस्थिती होती. दरम्यान, हिंगोलीतील कावड यात्रेतून संतोष बांगर यांनी विरोधकांना इशारा दिला. आमच्या नादाला लागू नका, असं म्हणत संतोष बांगर यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.