हसन मुश्रीफ यांच्या ‘त्या’ दाव्यावर शरद पवार यांचा सवाल, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Aug 27, 2023 | 12:17 AM

VIDEO | हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडी कारवाईनंतर त्यांच्या पत्नीने केलेल्या 'त्या' वक्तव्याचा शरद पवार यांनी केला पुन्नरूच्चार, काय म्हणाले शरद पवार बघा? हसन मुश्रीफ यांच्या दाव्यावर शरद पवार यांचा सवाल

Follow us on

मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ | कोल्हापुरच्या हसन मुश्रीफ यांच्यावर पडलेले ईडीचे छापे आणि त्यानंतर त्यांचा सत्तेत झालेला सहभाग यावरून शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर हसन मुश्रीफ यांनी पलटवार केल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक, बीड नंतर शरद पवार यांनी कोल्हापुरात जाहीर सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी थेट हसन मुश्रीफ यांना टार्गेट केले. यामध्ये सर्वात मोठा मुद्दा होता तो ईडी कारवायांचा…ईडी कारवाई करत आम्हाला त्रास दिला जातोय. त्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला, असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने केले होते. दरम्यान, शरद पवार यांनी त्याच वाक्याचा पुन्नरूच्चार करत हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हसन मुश्रीफ हे विरोधात असताना त्यांच्यावर चार ते पाच वेळा ईडी आणि याकरचे छापे पडले. मात्र सत्तेत गेल्यानंतर कारवाया कशा थांबल्या असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केलाय.