सह्याद्री देवराईच्या Biodiversity Park प्रकल्पाविरोधात पोलीस कुटुंब आक्रमक, काय आहे कारण?
VIDEO | सह्याद्री देवराईच्या Biodiversity Park प्रकल्पाविरोधात पोलीस कुटुंब आक्रमक, पालकमंत्री शंभुराज देसाई यांना दिलं निवेदन, या वेळी महिलांनी शंभूराज देसाई यांना राखी बांधली आणि आमची जागा आम्हाला आपण मिळवून द्या तीआमच्यासाठी ओवाळणी असेल, अशी भावनिक साद घातली
सातारा, २८ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही वर्षांपासून सातारा पुणे या महामार्गालगत म्हसवे या गावाजवळ पोलीसांच्या फायरींग प्रक्टीसची जागा राखीव आहे. या जागेत अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून बायोडायव्हर्सिटी पार्क उभा करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एका ओसाड माळावर विविध जातीची झाडे तेथे लावली गेली आहेत. परंतु ही जागा पोलीस दलाची असून ही जागा फायरींग प्रॅक्टीससाठी पोलिसांसाठी राखीव आहे. तसंच या जागेतील काही भागात पोलिसांच्या मुलांसाठी शाळा आणि विश्रामगृह तसेच खेळाची ग्राऊंड केली जाणार आहेत. यामुळं याठिकाणी हा प्रकल्प होऊ नये, अशी भुमिका पोलिसांच्या कुटुंबांनी घेतलीये. सयाजी शिंदे यांच्या प्रकलपानंतर पोलिसांना सरावासाठी जागा मिळणार नसल्याने आता पोलिस आणि त्यांचे परिवार महिला पोलिस आक्रमक झाल्या आहेत. याबाबत या महिलांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांना निवेदन दिलंय. यावरवही जागा पोलीसांसाठी राखीव आहे या बाबतीत सयाजी शिंदे यांच्या सोबत बोलू, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांनी दिलीये. या वेळी महिलांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना राखी बांधली आणि आमची जागा आम्हाला आपण मिळवून द्या तीच आमच्यासाठी ओवाळणी असेल, अशी भावनिक साद देखील घातली.