Chandrayaan 3 मोहिमेत सातारच्या ‘या’ उद्योजकाचा हातभार, Udayanraje Bhosale यांच्याकडून सन्मान, काय केलं कौतुक?
VIDEO | चांद्रयान 3 हे यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष, सातारचे प्रसिद्ध उद्योजक फारूक कुपर यांच्या कूपर कार्पोरेशन कंपनीकडून चांद्रयान 3 मोहिमेत हातभार, खासदार उदयनराजे भोसले म्हणाले....
सातारा, २८ ऑगस्ट २०२३ | चांद्रयान 3 हे यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. चंद्रयान 2 चे मिशन फेल झाल्यानंतर इस्रोच्या वैज्ञानिकांनी चंद्रयान 3 बाबत विशेष काळजी घेऊन त्यावेळी दिसून आलेल्या सर्व त्रुटी दूर केल्या होत्या. चंद्रयानासाठी लागणारी विशेष यंत्रसामुग्री वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवण्यात आली होती. यामध्ये सातारचे प्रसिद्ध उद्योजक फारूक कुपर यांच्या कूपर कार्पोरेशन कंपनीतून देखील चंद्रयान 3 साठी विशेष कॉम्प्रेसर मशीन बनविण्यात आले होते. या चंद्रयानाच्या मोहिमेत साताऱ्याच्या उद्योजकाचा लागलेला हातभार. याविषयी कुपर यांचे सर्वत्र कौतुक होतय. उदयनराजे भोसले यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन फारूक कुपर यांचा सन्मान करून कौतुक केलंय. तर इस्रोच्या वैज्ञानिकांनी सांगितल्याप्रमाणे हे विशेष असे कॉम्प्रेसर मशीन कूपर कंपनीत बनवण्यात आले होते. हे सर्व काम आमच्या कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने हाताळल्यामुळेच हे शक्य झालं असल्याची भावना यावेळी फारुख कुपर यांनी व्यक्त केली. याबरोबरच लवकरच भारताच्या आर्मीच्या टॅंकमध्ये कास्टिंग ब्लॉक बनण्यासाठी आमचे कर्मचारी सज्ज झाले असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रसिद्ध उद्योजक फारूक कुपर यांनी दिली.