शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबतच्या केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजे भोसले म्हणाले…
VIDEO | गड किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं मोठं वक्तव्य, सातारा शहरातील विकासकामांची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली, यावेळी ते म्हणाले, 'गड किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत संबंधित मंत्र्यांबरोबर एक बैठक होणे गरजेचे'
सातारा, २६ ऑगस्ट २०२३ | शरद पवार यांनी केलेल्या अजित पवार यांच्याबाबतच्या विधानावर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेत अजित पवार यांच्याबाबत युटर्न घेतला यावर उदयनराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘पवार साहेब काय बोलले ते त्यांनाच विचारा, दुसऱ्याच्या बाबतीत मी काय बोलू शकतो. मी काय अंतर्ज्ञानी नाही’, असे भाष्य करत उदयनराजे भोसले यांनी यावर बोलणं टाळल्याचे पाहायला मिळाले. सातारा शहरातील विकास कामांच्या पाहणी उदयनराजे भोसले यांनी केली यावर बोलताना अजिंक्यतारा किल्ल्याच्या रस्त्याच्या कामाबाबत उद्घाटन करण्यापासून कोणी कोणाला रोखलेले नाही. मात्र कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्टर सारखं काम करावे. मी कोणत्याही श्रेय वादात पडत नाही पण जो पत्रव्यवहार शासनासोबत झालाय तो कोणी केलाय तो पहावा, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. गड किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत संबंधित मंत्र्यांबरोबर एक बैठक होणे गरजेचे आहे. टुरिझम वाढवण्याच्या दृष्टीने जे काही करावे लागेल ते आम्ही करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.