Sangli Food Poison | विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा, विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट आली समोर
VIDEO | सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या उमदी येथील एका आश्रम शाळेतील जवळपास १०० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा, विषबाधा नेमकी कशामुळे झाली? आणि विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर
सांगली, २८ ऑगस्ट २०२३ | सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी इथल्या समता आश्रम शाळेतील साधारण १०० हून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. सांगलीच्या जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मिरज येथे उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या उपचारामध्ये कोणतेही हलगर्जी करू नये, अशा सूचना आरोग्य विभागाला देत विषबाधा प्रकरणी सखल चौकशी करून तात्काळ दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडून समाज कल्याण विभागाला देण्यात आल्या आहेत,त्याचबरोबर जिल्ह्यातल्या सर्व आश्रम शाळांना कोणतेही जेवण आहार घेऊ नये,अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांना आश्रमातील अन्नातून विषबाधा झाली नाही तर एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमांमध्ये दिलेल्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचे सांगितले जात आहे.