गुवाहाटीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय ठरलं? बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाण्यापूर्वी भारतीय जनता पक्षासोबत नेमकं काय ठरलं होतं? खोके की आणखी काही... आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी थेट सगळंच सांगितलं...
पुणे, २२ ऑगस्ट २०२३ | एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन होऊन आता वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. मात्र अद्याप त्यांच्या गुवाहाटी दौऱ्याची चर्चा होत आहे. अशातच आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठा गौप्यस्फोट केला.गुवाहाटीला जाण्यापूर्वी भारतीय जनता पक्षासोबत काय ठरले होते? यावर भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘मला गुवाहाटीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जाण्यापूर्वी अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे बोलणे झाले, अशी माहिती बच्चू कडू यांनी भर कार्यक्रमात दिली. त्यांच्या सांगण्यानुसार मी शिंदे सरकारमध्ये शामिल झाल्याचं गुपित आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे सांगितले. बच्चू कडू यांनी सांगितले की, मी शिंदे साहेबांसोबत येण्यासाठी अट घातली. ही अट म्हणजे दिव्यांग मंत्रालय होत असेल तर मी तुमच्यासोबत येतो, अशी होती. देवेंद्र फडणवीस यांना हे मी स्पष्टपणे सांगितले आणि त्यांनी त्याला होकार दिला. त्यामुळे मी गुवाहाटीला गेलो.’