पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
Pune News : पुणे जिल्ह्याला दोन पालकमंत्री आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष सुरु आहे.
पुणे | 29 ऑगस्ट 2023 : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे, ते सर्व एकाच ठिकाणी जाणून घेणार आहोत. पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या सुप्त संघर्ष सुरु आहे.
काय घडले गेल्या २४ तासांत
- कर्नाटकातून पाठविलेले पाच हजार किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले गेले.
- महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
- पुण्याच्या भोरमधील आर आर विद्यालयातील शेकडो विद्यार्थिनींनी सीमेवर 24 तास देशसेवेसाठी तैनात असलेल्या जवानांसाठी राख्या पाठवल्या आहेत.
- खेडमध्ये माजी खासदार शिवाजीराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्यात विकास कामांवरून श्रेयवादाची लढाई सुरु आहे.
- हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिंभा धरण ९३ टक्के भरले आहे.
- पुणे कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर मंगळवारी (२९ ऑगस्ट) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदविली जाणार आहे.
- पुणे मुंबई रेल्वेने प्रवास करताना लोणावळा खंडाळा येथील मंकीहिल पॉईन्टचे निसर्ग खुलले आहे. जणू काही स्वर्ग धर्तीवर उतरला असल्याचं मनोहारी दृश्य तयार झाले आहे.
- पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (३१ ऑगस्ट रोजी ) बंद राहणार आहे.
- मुंबई ऑगस्टच्या शेवटच्या सप्टेंबरच्या आठवड्यापासून पहिल्या आठवड्यात सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे.
- पुणे सिंहगडावर जाण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने देखील तिकीट काढता येणार आहे.
- पुणे राज्यात पुढील पाच दिवसात हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
Published on: Aug 29, 2023 10:31 AM