कांदा प्रश्नावरून राष्ट्रवादी-भाजपात श्रेयवादाचं राजकारण? अजित पवार म्हणताय, ‘आम्ही हपापलो…’

| Updated on: Aug 22, 2023 | 10:47 PM

VIDEO | महायुती सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याच्या चर्चांना उधाण, सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिलं थेट उत्तर, बघा काय म्हणाले अजित दादा?

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ | कांदा प्रश्नावरून केंद्र सरकारने खरेदीची घोषणा केली आहे. मात्र त्यापेक्षा जास्त चर्चाही श्रेयवादावरून रंगल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या भेटीआधीच देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून एक ट्वीट केलंय. त्यावरुन महायुती सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना महायुती सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे का? असा सवाल केला. यावर अजित पवार यांनी थेट उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले की, “ही श्रेयवादाची लढाई नाही. शेतकऱ्याला मदत करण्याची आमची भूमिका आहे”. आमचे निर्णय सामूहिक असतात, श्रेयवादासाठी आम्ही हापापलेले नाही आहोत, असे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले. तर केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा सरकारने केली आहे.

Published on: Aug 22, 2023 10:47 PM