Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं टाळं, काय आहे कारण?

| Updated on: Jan 17, 2024 | 11:51 AM

VIDEO | गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे अजब प्रस्ताव,स्वतःच्या कार्यालयाला ठोकलं टाळं अन् म्हणाले, 'शिपाईसोडून सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करा'

गडचिरोली, २९ ऑगस्ट २०२३ | गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्र हा सर्वात मोठा क्षेत्र म्हणून ओळखला जातो. अहेरी हा जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा क्षेत्र आहे. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या लोकांचे प्रमाणही मोठे आहे. परंतु, अहेरी उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी समाधानकारक काम करत नाहीत, असा अनुभव वैभव वाघमारे यांना आला. वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांना बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. पण, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही सुधारणा होताना दिसली नाही. वैभव वाघमारे यांनी कार्यालयीन कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न केला. वारंवार कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पण, या सूचनांची अंमलबजावणी होताना त्यांना दिसली नाही आणि त्यांनी स्वतःच्याच कार्यालयाला टाळं ठोकल्याचे समोर आले आहे. एक शिपाई वगळता इतर सर्व कर्मचारी काही काम करत नाहीत नाहीत. त्यांना निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव वैभव वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. आता जिल्हाधिकारी या प्रकरणी काय कारवाई होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 29, 2023 05:49 PM