Pune : गणेश विसर्जनासाठी पुण्यात 5 हजारांचा पोलीस बंदोबस्त, कसे होणार विसर्जन..!
शहरात सर्वत्र शांततेत मिरवणूका आणि विसर्जन होण्याच्या दृष्टीने 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे. वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण, मारामारी अशा घटना टाळण्याची जबाबदारी ही पोलिस कर्मचाऱ्यांवर राहणार आहे.
पुणे : शुक्रवारी 10 दिवसांच्या (Ganesh Festival) गणपती बाप्पांचे विसर्जन होत आहे. त्याअनुषंगाने (Public Celebration Board) सार्वजनिक उत्सव मंडळाची लगबग ही सुरु झाली आहे. तर दुसरीकडे गणरायाला शांततेत निरोप देण्यासाठी (Pune Police) पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. पुण्यात 3 हजार सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. शहरात सर्वत्र शांततेत मिरवणूका आणि विसर्जन होण्याच्या दृष्टीने 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे. वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण, मारामारी अशा घटना टाळण्याची जबाबदारी ही पोलिस कर्मचाऱ्यांवर राहणार आहे. दोन वर्षानंतर यंदा विसर्जन मिरवणूका ह्या निर्बंधमुक्त असणार आहेत. त्यामुळे कोणतेही बंधन मंडळावर नसणार आहे. पण मंडळांनी स्वत:हून काही बंधने पाळणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूका ह्या शांतेत होतील असा विश्वास पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.