Tax on Gifts | कोरोनानंतर (Corona) भारतात सोन्याची रेकॉर्डब्रेक खरेदी करण्यात आली. सोन्याची आयात (Gold Import) गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक झाली. देशात लग्न समारंभात, वाढदिवशी जवळचे नातेवाईक सोन्याचे आभूषण, दागिना गिफ्ट म्हणून देण्याची परंपरा आहे. पण हे गिफ्ट टॅक्स फ्री (Tax Free) नाही. तर त्यावर कर द्यावा (Tax On Gift) लागतो. नाहीतर थेट चोरीचे प्रकरण होते.
काही प्रकरणात सोने हे करमुक्त असते. त्यावेळी तुम्हाला कर द्यावा लागत नाही. घरातील सदस्यांकडून सोन्याचे मिळणारे गिफ्ट कर मुक्त असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला वारसा म्हणून मिळालेले सोन्याचा दागिन्यांवरही कर द्यावा लागत नाही. परंतु, तुम्ही हे दागिने विक्री कराल तर त्यावर कर द्यावा लागतो.
समजा तुम्हाला तुमच्या आईने सोन्याचे दागिने, आभुषणे गिफ्ट, भेट म्हणून दिले. हे दागिने तुमच्या आजोबांनी दिलेले असेल. त्यावेळी त्याची किंमत एक लाख रुपये होती असे समजूयात. आता सध्याच्या किंमतीनुसार या दागिन्यांचे मूल्य ठरवण्यात येईल. त्यातून एक लाख रुपये कपात करण्यात येईल. त्याआधारे वस्तूचे मूल्य(Capital Gain) ठरवले जाईल आणि त्यावर कर आकारला जाईल.
भेट दिलेले सर्वच सोने कर मुक्त नसते. कुटुंबातील सदस्यांकडून ते मिळाल्यास त्यावर कर लागत नाही. परंतु, कुटुंबाबाहेरील व्यक्तीने सोने भेट दिल्यास त्यावर कर लागतो. मुल्याधारित कर द्यावा लागतो.
एका वर्षात 50 हजार रुपयांपर्यंत दिलेली सोन्याची भेट कर मुक्त असते. पण त्यावर जर तुम्ही अधिक किंमतीची भेट दिली, तर मात्र हे गिफ्ट करपात्र ठरते.
कॅपिटल गेन टॅक्ससाठी सोन्याचा कालावधी महत्वाचा मानण्यात येतो. तुम्ही 36 महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी सोने ठेवले असेल तर त्यावर 20 टक्के कर द्यावा लागेल. तर कमी कालावधीत सोन्याची विक्री केली तर कमी कर द्यावा लागेल.