बेंगळुरू : बेंगळुरू शहर (Bengaluru Viral Photo) त्याच्या कॉर्पोरेट संस्कृतीसाठी ओळखलं जातं. परंतु तिथली लोकं ट्रॅफिकमुळं मोठी अडचणीत सापडली आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social media) एक फोटो चांगलाचं व्हायरल झाला आहे. महिला ऑफिसला निघाली आहे, रस्त्यात गाड्यांची अधिक वर्दळ असल्यामुळे ऑफिसला जायला त्या महिलेला उशिर झाला आहे. त्यामुळे त्या महिलेने बाईकवरती आपलं काम सुरु केल्याचं पाहायला मिळतं आहे. काही लोकांनी तिथल्या कामाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकांचं म्हणणं आहे की, कामाच्या व्यतिरिक्त खासगी आयुष्याकडे (personal life) सुध्दा लोकांनी लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर ऑफिसची वेळ सुध्दा पुढे पाठी असायला हवी.
हा फोटो निहार लोहिया नावाच्या एका व्यक्तीनं ट्विटरवरती शेअर केला आहे. या फोटोला पाहून सोशल मीडियावर कामाच्या कल्चरविषयी जोरदार कमेंट सुरु आहेत. ज्या व्यक्तीने हा फेोटो ट्विट केला आहे, त्यामध्ये त्याने लिहीलं आहे की, बेंगलुरु पीक मोमेंट, ती महिला रैपिडो बाईकवरती मागे बसून काम करीत आहे. काही लोकांनी म्हटलं आहे की, महिलेला ऑफिसकडून डेडलाइन मिळाली आहे. त्या महिलेनं कामाचं टाईम पुर्ण करण्यासाठी बाईकवरती लॅपटॉप सुरु केलं आहे. काही लोकं म्हणतं आहे की, महिलेने ऑफिसमध्ये काम करायला पाहिजे होतं. त्यामुळे तिला त्याच्या खासगी आयुष्यात वेळ मिळाला असता.
Peak Bangalore moment. Women working on a rapido bike ride to the office. #TrafficJam #TrafficAlert #bangaloretraffic #Bangalore #roadblock #peakbangalore pic.twitter.com/bubbMj3Qbs
— Nihar Lohiya (@nihar_lohiya) May 16, 2023
या पोस्टला आत्तापर्यंत ४० हजार लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर लोकांची रिएक्शन मिळणं अधिक गरजेची आहे. काही लोक कमेंट करुन सांगत आहेत की, कार्यालयात पुर्णवेळ देणं गरजेचं नाही. काही लोकं घरातून काम करण्याची परवानगी द्यावी.