मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Viral Video) अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपणास पाहायला मिळत आहे. गाड्यांच्या अपघाताचे सीसीटिव्ही व्हिडीओ (Accident Viral Video) अनेकांना रोज पाहायला मिळतात. अनेकदा गाडी चालवत असताना नियमावली न पाळल्यामुळे अपघात होत असतात. सध्या एका बाईक चालकाचा एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पाहायला मिळत आहे की, बाईक (bike) चालकाच्या डोक्यात नारळ पडला आहे. त्यानंतर पुढे काय झालंय हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अपघातापासून तुम्हाला सुरक्षा हवी असल्यास तुम्ही नियमाचं पालन करायला हवं.
रस्त्यावर चालत असताना सुध्दा काही लोकं नियम पाळतात असं दिसून आलं आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाईक चालवत आहे. त्या व्यक्तीने बाईक चालवत असताना सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट घातलेलं नाही. बाईक चालवत असताना कोणत्याही व्यक्तीने हेल्मेट घालणं गरजेचं आहे. सध्या जो एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे, त्यामध्ये बाईक चालक व्यक्तीने हेल्मेट घातलेलं नाही.
बाईक चालवत असलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातलेलं नाही हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. ज्यावेळी ती व्यक्ती बाईकवरून निघालेली आहे. त्यावेळी पुढून आलेल्या व्यक्तीने हा सगळा अपघात आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. झाडाचा तुटलेला नारळ त्या व्यक्तीच्या डोक्यात पडतो. त्यावेळी त्याला मोठी जखम झाली आहे. त्यावेळी बाईक चालकाचं गाडीवर असलेलं नियंत्रण सुटलं आहे.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, हेल्मेट न घातल्यामुळे बाईकचा अपघात झाला आहे. हा व्हिडीओ दोन लाख २० हजार लोकांनी लाईक केला आहे. 4.6 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. कमेटमध्ये अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, दुचाकी गाडी चालवत असताना हेल्मेट घालणं अधिक गरजेचं आहे.