मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (Amazing Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ लोकांचं मनोरंजन करीत आहे. त्याचबरोबर लोकांना आकर्षित सुध्दा करीत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्या लोकांना आयुष्यात संघर्ष करायचा आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडीओ एकदम बेस्ट आहे. प्राण्यांचे (animal viral video) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. हा व्हिडीओ देशातील प्रसिध्द उद्योजक हर्ष गोयनका यांनी ट्विटरवरती शेअर केला आहे.
या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, प्राण्याचं एक छोटसं पिल्लू दिसतं आहे. प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जे काही करावं लागतं. ते सगळं या व्हिडीओतून दिसत आहे. हा व्हिडीओ अधिक नेटकऱ्यांना आवडला आहे. हा व्हिडीओ काही व्यक्तींनी त्यांच्या दोस्तांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष खेचले आहे.
देशातील प्रसिध्द उद्योजक हर्ष गोयनका यांनी आपल्या ऑफिशियल अकाउंटवरुन एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामध्ये एक छोटसं पिल्लू नाल्याच्या जवळ जात आहे. नाल्याच्या दुसऱ्या बाजूला ते पिल्लू जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी ते पिल्लू उडी घेऊन दुसरीकडं जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या व्हिडीओमध्ये त्या पिल्लाला नाल्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी मोठी अडचण होत आहे.
Do not fear failure but rather fear not trying
pic.twitter.com/gWlEBQkv8w— Harsh Goenka (@hvgoenka) May 16, 2023
प्राण्याचं पिल्लू त्यावेळी अजिबात हार मानत नाही, प्रत्येकवेळी कुत्र्याचं पिल्लूवरती येण्याचा प्रयत्न करीत आहे. शेवटी ते पिल्लूवरती पोहोचलं आहे. या व्हिडीओला हर्ष गोयनका यांनी सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. ‘अपयशाला घाबरू नका, प्रयत्न न करण्याची भीती बाळगा’ सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ४२ हजारपेक्षा अधिक लोकांनी शेअर केला आहे. लोकं हा व्हिडीओ पाहून अधिक कमेंट करीत आहेत.