मुंबई: बऱ्याच लोकांना बिझनेस करायचा असतो. पण बिझनेस मध्ये उतरताना अनेकांना शंका असते की आपण यात कितपत यशस्वी होऊ. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे तरुणांसाठी यशस्वी उद्योजक म्हणून उत्तम आहे. एलन मस्क सुद्धा त्यातच येतात. या यशस्वी तरुणांचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात हे व्हिडीओ खूप प्रेरणादायी असतात. आपल्याला आयुष्यात काहीही करायचं असलं तरी प्रेरणा अत्यंत महत्त्वाची असते, मग आपण असे व्हिडीओ बघून स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा प्रयत्न करतो. मोटिव्हेशनल व्हिडीओ या प्रकारात अशा प्रकारचे व्हिडीओ मोडतात.
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात मार्क झुकेरबर्ग सांगतायत की त्यांना फक्त एक कंपनी सुरु करायची नव्हती, त्यांचे अनेक वेगळे हेतू यामागे होते कंपनी सुरु करणं हा त्यातला फक्त एक भाग होता. हा व्हिडीओ बघून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. झपाट्याने बदलत असणाऱ्या इंटरनेटच्या युगात बिझनेस करणाऱ्या व्यक्तीने किती वेगात काम केलं पाहिजे हे मार्क झुकेरबर्ग सांगतात. हा व्हिडीओ हर्ष गोएंकाने ट्विट केलाय.
Success formula of Zuckerberg pic.twitter.com/5AVmkg0fVA
— Harsh Goenka (@hvgoenka) August 9, 2023
या व्हिडिओमध्ये झुकेरबर्गच्या यशाची गुरुकिल्ली – पॅशन असल्याचं कळतंय. वेगवान आयटी जगात, जिथे तासनतास आणि सतत प्रयोग करणे सामान्य आहे, तिथे आपल्या कामाची आवड टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. झुकेरबर्ग या व्हिडिओमध्ये म्हणतो, “माझे ध्येय कधीही केवळ कंपनी तयार करणे नव्हते.” या व्हिडिओला 24.5 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. लोकांना हा प्रेरणादायी व्हिडिओ खूप आवडलाय.