बंगळुरू: देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार असूनही आणि लोक काँग्रेसला कमकुवत पक्ष मानत असले तरी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल काही औरच सांगत आहेत. कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. भाजप 80 पेक्षा कमी जागांवर घसरल्याचे दिसत आहे, तर काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेत येताना दिसत आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले की, पक्ष 2023 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि हा काँग्रेससाठी मोठा विजय ठरेल. सिद्धरामय्या यांच्या मते कर्नाटकातील जनता भाजप सरकारला कंटाळली आहे, त्यांना बदल हवा आहे. या मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बंगळुरूमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, त्यात अनेक चर्चा होणार आहेत. सोशल मीडियावरही #ElectionResults टॉप ट्रेंड होत आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि मजेशीर मीम्स देखील शेअर करत आहेत.
Prefect time to use @RahulGandhi
meme for @BJP4India#BJPMuktSouthIndia#KarnatakaElectionResults2023 pic.twitter.com/5MFXQZLOQp— ilovemnvr (@ilovemnvr1) May 13, 2023
#KarnatakaPolls #KarnatakaElectionResults #KarnatakaElectionResults2023
BJP Supporters: pic.twitter.com/0ESz0QYsOZ— Memes Junction (@Nikhil_memes) May 13, 2023
Congress conquered in the Karnataka assembly elections
#KarnatakaElectionResults2023
INC Supporters : pic.twitter.com/zvJuj3ms8m— Memes Junction (@Nikhil_memes) May 13, 2023
Congress is leading with majority in Karnataka assembly elections #KarnatakaElectionResults2023#votecounting #KarnatakaElectionResults pic.twitter.com/mGEMD9To5b
— Memes Junction (@Nikhil_memes) May 13, 2023
Congress is leading in Karnataka elections #ABPResults #votecounting #KarnatakaElectionResults2023
Other Parties: pic.twitter.com/WOGPdw9EYj— Memes Junction (@Nikhil_memes) May 13, 2023
ഇപ്പോഴാണ് ഈ Meme പൂർത്തിയായത്
Kerala, Karnataka, Tamilnadu, Andhrapradesh ♥️#KarnatakaElectionResults2023 pic.twitter.com/X9iB6u4IYq
— FyZy (@fyzy_dq) May 13, 2023
आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहावं लागेल. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डीके शिवकुमार हे कॉंग्रेसचे संकटमोचक मानले जातात आणि ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जातात, तर सिद्धरामय्या यांच्या मुलाने सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळतील असे स्पष्टपणे सांगितले आहे.