‘चंद्रा’वरुन थेट पृथ्वीवर लँड, गौतमी पाटीलला पश्चाताप, रुपाली ठोंबरेंसोबत लाईव्ह येऊन म्हणाली…

| Updated on: Sep 22, 2022 | 7:30 PM

Gautami Patil Dance Video | या व्हिडीओनंतर इन्स्टाग्राम, फेसबूकवर गौतमीला लाखो फॉलोअर मिळाले, पण या फॉलोअरसोबत संकटही आलं.

चंद्रावरुन थेट पृथ्वीवर लँड, गौतमी पाटीलला पश्चाताप, रुपाली ठोंबरेंसोबत लाईव्ह येऊन म्हणाली...
नृत्यांगणा गौतमी पाटीलने आता माफी मागितली आहे
Follow us on

पुणे: गौतमी पाटील,(Gautami Patil) सध्या हे नाव सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. याला कारण, गौतमी पाटीलच्या अदा नाहीत, तर तिचं अश्लील नृत्य आहे. अल्पवधीत फेमस होण्यासाठी काहीही, हा मंत्र ती जणू कोळून प्याली, आणि अप्सरा ते चंद्रा या (Chandra Dance Video) गाण्यांवर असे काही नाचली, की तिचे व्हिडीओ लगेच व्हायरल (Viral Video)व्हायला सुरुवात झाली. पण आता या सगळ्याचा तिला इतका जबर फटका बसलाय, की थेट जेलवारी करण्याचीही वेळ तिच्यावर येऊ शकते. याच भितीने तिने आता माफी मागितली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांच्याकडे येऊन तिने दिलगिरी व्यक्त केली आहे.

त्याचं झालं असं, की दहीहंडीवेळी पुण्यात अनेक कार्यक्रम होते. अनेकांच्या स्टेजवर कलाकार नृत्यासाठी येत होते. त्यातच गौतमीही दहीहंडीच्या ठिकाणी पोहचली, आणि त्यानंतर तिने जो स्टेजवर धुमाकूळ घातला, त्याने इन्स्टाग्रामवर एका रात्रीत ती चमकू लागली. तिचे सगळे व्हिडीओ इन्स्टाग्रामपासून ते फेसबूक, ट्वीटरवर ट्रेंड झाले. या व्हिडीओत गौतमीने जे केलं, ते अश्लीलतेच्याही सीमा ओलांडणारं होतं.

या व्हिडीओनंतर इन्स्टाग्राम, फेसबूकवर गौतमीला लाखो फॉलोअर मिळाले, पण या फॉलोअरसोबत संकटही आलं. बरं, असं करण्याची तिची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही तिने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात अशाच अदा दाखवल्या होत्या. पण, दहीहंडीनंतर तिच्यावर खऱ्याअर्थाने टीका होण्यास सुरुवात झाली. यानंतर अनेक लावणी कलाकारांनी गौतमीवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.

हे सुद्धा वाचा

गौतमी पाटीलने माफी मागितली!

हे सगळं घडल्यानंतर, गौतमीवर कारवाई होईल याची दाट शक्यता होती. आपल्यावर आलेलं संकट पाहता ती पोहचली राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्या कार्यालयात, आणि तिने झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यापुढे कुठल्याही प्रकारे आपल्याकडून असा प्रकार होणार नाही. अनावधानाने हे कृत्य झाल्याचंही तिने कबूल केलं.

लावणी कलाकारांकडूनही गौतमीवर टीका!

माझ्याकडून चुकी झाली, तुम्ही अशी चुकी करु नका असा सल्लाही गौतमी या व्हिडीओत देताना दिसत आहे. शिवाय, ज्या नेटकऱ्यांनी गौतमीच्या नावाने फेक अकाऊंट उघडले आहे, ते ताबडतोब बंद करावे, तिचे व्हिडीओ व्हायरल करणं बंद करावं, नाहीतर फेक अकाऊंट चालवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही गौतमीने दिला आहे.