मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्या होत आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमध्ये होणार आहे. हा सामन्यातील विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात कोणते खेळाडू जबरदस्त कामगिरी करतील याचा अंदाज घेऊयात. सामन्यातील खेळाडूंना निवडून ड्रीम 11 तयार करू शकता.
चेन्नईच्या एम ए चिंदबरम स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. इथली खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे फलंदाजांना जबरदस्त फायदा होईल. पण फिरकीपटूही या खेळपट्टीवर आपली जादू दाखवू शकतात. त्यामुळे या मैदानात धावांचा वर्षाव होईल यात शंका नाही. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
गुजरात टायटन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, साई सुदर्शन, डेविड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, वृद्धिमान साहा (विकेटकीपर)
चेन्नई सुपर किंग्स : एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना, रवींद्र जडेजा
चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.