मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामधील सामन्यात हैदराबाद संघाने 4 विकेट्स संघाने विजय मिळवला. नाट्यमयरित्या झालेल्या या सामन्यामध्ये हैदराबादने मारली बाजी. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यामध्ये हैदराबाद राजस्थानच्या तोंडचा घास हिसकवल्यासारखा विजय मिळवला आहे. सुपर सनडेला दोन सामने झाले. यामधील पहिल सामना गुजरात टायटन्स संघाने जिंकला तर दुसरा सामना हैदराबाद संघाने आपल्या खिशात घातला. पॉइंट टेबलमध्ये पाहा कोण आहे कुठे?
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी गुजरात टायटन्स 16 संघांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानी सीएसके 13 गुणांसह, तिसऱ्या स्थानी लखनऊ संघ 11 गुणांसह त्यानंतर सर्व ट्राफिक जाम झालेलं दिसत आहे. पॉइंट टेबल्स राजस्थान रॉयल्स, आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ अनुक्रमे 10 दहा गुणांसह आहेत. सोमवारी होणाऱ्या पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यामध्ये पंजाबने विजय मिळवला तर त्यांना तिसऱ्या स्थानी जाण्याची संधी आहे.
सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर 4 विकेट्सने सनसनाटी विजय मिळवला आहे.राजस्थानने सनराजर्स हैदराबादला विजयासाठी 215 धावांचं टार्गेट दिलं होतं. हे आव्हान हैदराबादने 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अब्दुल समद हा हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला. हैदराबादच्या फलंदाजांनी या 215 धावांचा शानदार पाठलाग करत सामना शेवटच्या बॉलपर्यंत आणून ठेवला.
हैदराबादला शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती. तेव्हा संदीप शर्मा याने अब्दुल समद याला कॅच आऊट केलं. मात्र तो बॉल नो बॉल होता. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी 1 बॉलमध्ये 4 धावांची गरज होती. तेव्हा समद कडक सिक्स ठोकत हैदराबादला थरारक विजय मिळवून दिला. संदीप शर्मा याचा एक न बॉल गेमचेंजर ठरला.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल.