जयपूर | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये रविवारी 7 मे रोजी 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स टीमने लखनऊ सुपर जायंट्स संघांवर 56 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या मॅचमध्ये सनराजयर्स हैदराबाद टीमने राजस्थान रॉयल्स संघांवर शेवटच्या बॉलवर 4 विकेट्सने विजय मिळवला. गुजरातने विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. तर लखनऊला आता आगामी सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तर हैदराबादने शेवटच्या बॉलवर विजय मिळवल्याने राजस्थान रॉयल्सची अडचण झाली आहे.
तसेच या विजयासह हैदराबादने प्लेऑफसाठीची जर तरची आशा कायम राखली आहे. मात्र या दोन्ही सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीतील पहिल्या 5 खेळाडूंमध्ये अदलाबदल झालीय. नक्की कुणाला तोटा कुणाला फायदा झालाय, हे सविस्तर जाणून घेऊयात. आपण 6 आणि 7 मे रोजीच्या कामगिरीच्या आधारावर पहिल्या 5 खेळाडूंच्या आकड्यांची तुलना केली आहे.
गुजरात टायटन्स टीमच्या शुबमन गिल याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 51 बॉलमध्ये 2 चौकार आणि 7 खणखणीत कडक सिक्स ठोकले. शुबमनने अशा प्रकारे 94 धावांनी नाबाद खेळी केली. तर राजस्थान रॉयल्स टीमच्या यशस्वी जयस्वाल याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 35 धावांची खेळी केली. या दोन्ही युवा फलंदाजांनी या निर्णायक खेळीसह ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत पु्न्हा कमबॅक केलंय. आरसीबी टीमचा फाफ डु प्लेसिस हा अव्वल स्थानी ऑरेन्ज कॅपसह विराजमान आहे.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
यशस्वी याने तिसऱ्या क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी उडी घेतलीय. तर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आलाय. त्यामुळे डेव्हॉन कॉनवे याची चौथ्या क्रमांकावर घसरण झालीय. यामुळे विराट कोहली चौथ्या क्रमांकावरुन पाचव्या पोजिशनला फेकला गेलाय.
गुजरात टायटन्स टीमच्या मोहम्मद शमी आणि राशिद खान या दोघांनी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर राजस्थान रॉयल्सच टीमच्या युजवेंद्र चहल याने सनरायजर्स हैदराबाद टीमच्या 4 फलंदाजंना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. या तिघांना या कामगिरीचा चांगलाच फायदा झाला आहे. शमीने 1 विकेट घेतल्याने त्याच्याकडे पुन्हा एकदा पर्पल कॅप आली आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
शमीने 1 विकेटसह चेन्नई सुपर किंग्स टीमच्या तुषार देशपांडे याच्याकडे असलेली पर्पल कॅप हिसकावून घेतली. यासह शमी पहिल्या क्रमांकावर पोहचला. तर देशपांडेची तिसऱ्या क्रमांकावर घसरला. राशिदने एकमेव विकेट घेत तिसऱ्या वरुन दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सच्या पीयूष चावला याने आपलं चौथं स्थान कायम राखलंय. तर युजवेंद्र चहलने 4 विकेट्स घेतल्याने त्याची पाचव्या स्थानी एन्ट्री झाली. परिणामी पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंह हा सहाव्या क्रमांकावर गेला.