तामिळनाडू | मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातीत सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मु्ंबईने आयपीएल 16 व्या मोसमातही प्लेऑफसाठी धडक मारली आहे. मुंबईची या 16 व्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली आहे. यासह मुंबईची प्लेऑफमध्ये धडकण्याची एकूण 10 वी वेळ ठरली आहे. प्लेऑफमध्ये सर्वात शेवटी पोहचल्याने मुंबईचा 24 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध एलिमिनेटर मॅच होणार आहे.
प्लेऑफच्ये दिशेने पुढे जाण्यासाठी एलिमिनेटरमध्ये विजयी व्हावं लागेल. त्यामुळे दोन्ही संघामध्ये कडवी टक्क दिसून येणार आहे. या दोन्ही संघांची आयपीएल इतिहासातील एकमेकांसमोरची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे, ते आपण पाहणार आहोत.
लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यातील हेड टु हेड आकडेवारी ही पलटणसाठी फार चिंताजनक आहे. लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यात एकूण या 16 व्या मोसमात एकदा आणि त्याआधी 2022 मध्ये दोनवेळा आमनासामना झाला आहे. या एकूण 3 सामन्यात लखनऊने मुंबईला लोळवलंय. स्ट्राँग बॅटिंग लाईनअप असणाऱ्या मुंबई इंडियन्सची लखनऊ विरुद्ध मात्र बॅटली लो होते. मुंबईला अजूनतरी लखनऊवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मुंबईसमोर लखनऊचं आव्हान आहे.
मुंबईला या 16 व्या मोसमात लखनऊने 5 धावांनी पराभूत केलं होतं. मुंबईने या सामन्यात अखेरच्या ओव्हरपर्यंत लढत दिली होती. मात्र मुंबईचे प्रयत्न 5 धावांनी अपुरे पडले. त्यामुळे मुंबईचा लखनऊवर विजय मिळवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.
आता मुंबईला लखनऊचा पराभव करण्याची संधी एलिमिनेटरच्या माध्यामातून चालून आली आहे. आता मुंबई इथे जिंकली तर क्वालिफायर 2 मध्ये पोहचेल. पण जर मुंबई पराभूत झाली, तर इथेच पलटणचा बाजार उठेल. त्यामुळे लखनऊ विरुद्धच्या सामन्यासाठी पलटणची रणनिती ही कशी असेल, हे पुढील 24 तासातच स्पष्ट होईल.
लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, प्रेराक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान बेंच स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक होडो , अर्पित गुलेरिया, मोहसिन खान, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, करुण नायर, नवीन-उल-हक, मनन वोहरा, कृष्णप्पा गौथम आणि करण शर्मा.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.