तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 6 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. आता रायव्हलरी वीक सुरु झाल्याने क्रिकेट चाहत्यांना एकसेएक सामने पाहायला मिळणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत पाकिस्तान सामना यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेत. त्याच प्रकारे आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध मुंबई या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं.
या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा घरच्या स्टेडियममध्ये पराभव केला होता. त्यामुळे 6 मे रोजी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर घरच्या मैदानात मात करुन मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. या निमित्ताने आपण या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना हा 6 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचं आयोजन हे तामिळनाडूतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यातील या हायव्होल्टेज मॅचला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.
चेन्नई विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.तसेच सामन्याचे प्रत्येक अपडेट्स टीव्ही 9 मराठी या वेबसाईटवरही जाणून घेता येईल.
चेन्नई विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना हा जिओ एपच्या माध्यमातून मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल.
चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.