मुंबई : अनेकवेळा असे घडते की, करिअरमध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाहीत, किंवा तुमचे अभ्यासात मन लागत नाही, घरात कलह आणि वाद निर्माण होतात, घरात शांततेचे वातावरण नसते आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते. हे सर्व दृष्ट लागल्याने (Negative Energy) देखील होऊ शकते. वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया. प्राचीन काळापासून, लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहेत. आज आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.
मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो, कारण त्यांचे मन-मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते. जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मुल रडू लागते. दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात. उदा, एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मुल रडू लागते, त्याचे शरीर तापाने फणफणते, चिडचिड करणे इ गोष्टी दिसून येतात. काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
1- तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावीजमध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्यावा. हे तावीज काळ्या दोर्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे.
2- मुलाला अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालीसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा. त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने मुलाला टिळा लावून लाल आसनावर बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत. या उपायाने मुलांची भीती दूर होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)