पुणे, गौरी-गणपती सण (Ganeshotsav 2022) अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने मूर्ती कारागिरांच्या हाताला वेग आला आहे. पुण्यातील भोरमधील उत्रौली कुंभारवाड्यात गणेश मूर्तीशाळांमध्ये मूर्तींवर (Ganesh Murti) रंगाचा शेवटचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. गणेशमूर्ती रंगविण्यासाठी चित्रशाळांमध्ये अहोरात्र मेहनत घेतली जात आहे.दरवर्षी या ठिकाणचे गणेशमूर्तिकार जवळपास 15 हजार गणेशमूर्ती आणि 40 हजार गौराई घडवितात. महाराष्ट्र आणि देशातील प्रमुख शहराबरोबरच परदेशातही या मूर्तींनामोठी मागणी आहे. यंदा सर्वच गोष्टी महागल्याने मूर्तीच्या किमतीही 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर, यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे मूर्तिकारांबरोबरच नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.
भोर तालुक्यातील उत्रौली गावातल्या कुंभारवाड्यात गणेशमूर्तिकार दरवर्षी हजारोंच्या संख्येने गणेशमूर्ती आणि गौराई घडविण्याचे काम करीत असतात, उत्रौली आणि परिसरात तयार होणाऱ्या गौराई तसंच गणेशमूर्तींना शेगाव, लातूर,बूलडाणा, मुंबई, ठाणे, लालबाग, धुळे, गुजरात, सुरत, बडोदा, दिल्ली, मद्राससह परदेशात इंग्लंड, अमेरिका येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
मागील दोन वर्षात गणेश मूर्तीशाळांना कोरोनाचा फटका बसला. मात्र यंदा निर्बंध शिथिल झाल्यानं आनंदाच वातावरण आहे. गणेश मूर्ती बनविताना मुर्तीची उंची, शाडुची माती, लाल माती, मुलतानी मातीचा वापरावर भर द्यावा लागतो. वाढलेली मजुरी, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली 10 % वाढ, रंगांची 25% वाढ, इमिटेशन ज्वेलरी 20 % यामुळे गणेशमूर्तीची किंमत यंदा 20% ने वाढणार आहे.
मूर्तिकारांकडून रेखीव सुबक आकर्षक तसेच योग्य रंगसंगतीचा वापर करून गणेश मूर्ति तयार केल्या जात आहे. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, पुण्यातील मानाचे पाचही गणपती, टिटवाळा, चौरंग पद्मासन, बालगणेश,शिवरेकर, जयमल्हार, सिध्दीविनायक,चरण पूजनाचै गणपती, यासह 72 प्रकारच्या गणपती मुुुुर्तीीना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उत्रौली गावातमधील कुंभारवाड्यात दरवर्षी साधारणपणे 15 हजार गणपती आणि 40 हजार गौराई तसेच लक्ष्मीचे पाऊल,मुषक, हरतालिका, भातुकलीच्या खेळातील जाती, भांडी, तुळशीवृंदावन, कृष्ण बनविले जातात.
या भागातील 57 वर्षांची परंपरा असलेला जयश्री गणेश कला मंदिर, हा गौरी गणपती कारखाना अविरत चालू आहे . कारखान्यामध्ये बारा महिने 29 महिला कारागीर मूर्ती घडवण्याचे काम करतात. उत्कृष्ट दर्जाच्या सर्वांग सुंदर गौरी आणि गणेश मूर्ति बनवल्या जातात, गणेश चतुर्थी उत्सव हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, करोनाच्या संकटामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करता न आल्याने यंदा नागरिका, गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.