नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गोव्यात सरकार स्थापनेआधी मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशातच फडणवीसांचा दिल्ली दौरा आणि गोव्याच्या अनुशंगानं होणारी बैठक याला महत्त्व प्राप्त झालंय. गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election Result) पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर गोवा विधानसभेत भाजपनं 20 जागा जिंकत दमदार कामगिरीही करुन दाखवली. गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं निवडणुका लढवल्या होत्या. दरम्यान गोव्यात मुख्यमंत्रिपदावरुन (Who will be Goa CM) आता पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. गोवा मुख्यमंत्री पदाबाबत नवी दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा सुरु आहे. प्रमोद सावंत गोव्यातून दिल्लीत रात्री दाखल होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. सावंत यांच्या येण्यापूर्वी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे.
गोव्यात प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यातील संघर्ष काही लपून राहिलेला नाही. अशातच आता गोव्यातील मुख्यमंत्री पदाबाबत बंड शमणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अमित शहा यांच्या उपस्थितीत राजधानी नवी दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गोव्यात मुख्यमंत्रीपदावरुन रच्चीखेच सुरु असल्याचं बोललं जातंय. गोव्याच्या राजकारणात त्यामुळे पुन्हा एकदा चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. याआधीच विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत यांच्यातील स्पर्धाही अनेकदा चर्चिली गेलेली आहे. अशातच निवडणुकीतील विजयानंतर विश्वजीत राणेंनी मतदारांचे आभार मानताना जाहिरातही प्रसिद्ध केली होती. मात्र या जाहिरातीमध्ये प्रमोद सावंत यांचा फोटो कुठेच दिसून आला नव्हता.
Glimpses from the swearing-in ceremony where I took Oath as the Member of 8th Goa Legislative Assembly. pic.twitter.com/886BaWpbKc
— VishwajitRane (@visrane) March 15, 2022
यावरुनही अनेक तर्क वितर्क लढवण्यात आले होते. प्रमोद सावंत यांचं नेतृत्त्व विश्वजीत राणे यांना मान्य नाही का, असाही प्रश्न विचारला जातो आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत हायकमांड निर्णय घेईल, असं विश्वजीत राणे माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. तर दुसरीकडे भाजपनं मात्र गोवा विधानसभेच्या निवडणुकांआधीच आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा डॉ. प्रमोद सावंत हे असतील, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉ. प्रमोद सावंत आणि तत्कालीन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील संघर्षही संपूर्ण राज्यानं अनुभवला होता.
आता विश्वजीत राणे हे मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत, अशीही कुजबूज ऐकायला मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर गोव्याचं राजकारण पुन्हा एकदा तापू लागलंय. अशातच आता डॉ. प्रमोद सावंत हे देखील दिल्ली बैठकीसाठी जाणार असून फडणवीस, अमित शाह यांच्यासोबत नेमकी काय चर्चा होते, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे.
Hon’ble CM @DrPramodPSawant and BJP President Shri @ShetSadanand met His Excellency Governor Shri @psspillaigov Ji at Raj Bhavan. Hon’ble CM also submitted his resignation letter. Hon’ble Governor has asked Dr Pramod Sawant to continue as the caretaker CM. pic.twitter.com/oDimzH2XA4
— BJP Goa (@BJP4Goa) March 12, 2022
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर भाजपनं जबाबदारी टाकली होती. त्यांच्याकडे गोव्याचं मुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यानंतर 2022मध्येही त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं निवडणुकीला सामोरं जात घसघशीत यशही मिळवलंय.
tv9 Special : भाजपात जाणार की नाही? उत्त्पल पर्रिकर म्हणतात, हळू हळू सॉर्टआऊट होतील
विश्वजीत राणेंच्या राज्यपाल श्रीधरन पिल्लईंच्या भेटीनं खळबळ, गोव्यात तर्क वितर्क सुरु
गोवा भाजपमध्ये सुंदोपसुंदी; मुख्यमंत्री सावंतांविरोधात आमदार राणेंनी थोपटले दंड, प्रकरण काय?