अकोला : राज्याच्या प्रमुख महापालिकांचा निवडणूक (Election 2022) कार्यक्रम जाहीर झाला आहे. आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंडवड या प्रमुख महापालिकांसोबत अकोला महापालिकेचा (AMC election 2022) देखील समावेश आहे. सध्या अकोला (Akola) महापालिकेत भाजपाची सत्ता असून, यावेळी तीस प्रभागातील 91 जागेसाठी मतदान होणार आहे. प्रभाग क्रमांक दोन बाबत बोलयाचे झाल्यास प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेल्यावेळी तीन जागांवर काँग्रेसने तर एका जागेवर भाजपाने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक दोन अ मधून काँग्रेसचे पराग कांबळे हे विजयी झाले होते, प्रभाग क्रमांक दोन ब मधून भाजपाच्या उमेदवार अनिता चौधरी या विजयी झाल्या होत्या. क मधून काँग्रेसच्या उमेवादर चांदनी शिंदे यांनी बाजी मारली होती. तर ड मधून काँग्रेसचे उमेदवार मो. इकबाल सिद्धीकी हे विजयी झाले होते.
प्रभाग क्रमांक दोनमध्ये हाजीनगर, अकबर प्लॉट, परदेशी पुरा, साधना चौक, मच्छी मार्केट, लाडीस फैल सोळाशे प्लॉटचा भाग, राजीव गांधी नगर, अशोक नगरचा काही भाग यांचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक दोनची एकूण लोकसंख्या 15597 एवढी आहे. त्यापैकी 3082 एवढी अनुसूचित जातीची तर 305 एवढी अनूसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 च्या निवडणूक निकालावर नजर टाकल्यास आपल्याला असे दिसून येते की या प्रभागात काँग्रेसचे वर्चस्व आहे. गेल्या वेळी तीन जागांवर काँग्रेसचा तर एक जागेवर भाजपाचा विजय झाला होता. प्रभाग क्रमांक दोन अ मधून काँग्रेसचे पराग कांबळे हे विजयी झाले होते, प्रभाग क्रमांक दोन ब मधून भाजपाच्या उमेदवार अनिता चौधरी, क मधून काँग्रेसच्या उमेवादर चांदनी शिंदे तर ड मधून काँग्रेसचे उमेदवार मो. इकबाल सिद्धीकी हे विजयी झाले होते.
महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक दोन अ हा अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक दोन ब हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तर दोन क हा विनारक्षित असे आरक्षणाचे स्वरुप आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
गेल्यावेळी प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. चार जागांपैकी तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. तर एका जागेवर भाजपाला विजय मिळाला होता. मात्र यंदा राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडी पहाता भाजपासाठी अनुकूल वातावरण तयार होताना दिसत आहे. मात्र तरी देखेली काँग्रेस पूर्ण तयारीसह महापालिका निवडणुकीत उतरल्यास भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.