…तर आमदार सोडून जातील, अंबादास दानवेंचा पुन्हा शिंदे गटाला टोला

| Updated on: Nov 03, 2022 | 8:43 AM

अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याणं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

...तर आमदार सोडून जातील, अंबादास दानवेंचा पुन्हा शिंदे गटाला टोला
Follow us on

मुंबई : दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याणं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबदास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया देताना शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे.  मंत्रिमंडळाचा (Cabinet)  विस्तार झाल्यास काही लोक सोडून जातील अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हटलं दानवे यांनी

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी सरकारला जोरदार टोला लगावला आहे.  मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर लोक सोडून जातील अशी भीती सरकारला वाटत आहे. त्यांनी अनेकांना शद्ब दिला आहे. एवढ्या लोकांना दिलेला शद्ब पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर काहीजण सोडून जातील या भीतीनेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

विरोधकांची टीका

मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत आहे, यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. लंबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया देताना काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टोला लगावला होता. शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारालाच मंत्रिपद हवं आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.  तर जोपर्यंत बहुमत आहे, तोपर्यंत सरकार सत्तेत राहील असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.