विधानसभा पोटनिवडणुकीत कोणाच्या पोटात येईल गोळा..भाजपला संधी की परीक्षा

देशातील 6 राज्यांतील सात विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी उद्या म्हणजेच गुरुवारी मतदान होत आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीत कोणाच्या पोटात येईल गोळा..भाजपला संधी की परीक्षा
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 11:03 PM

नवी दिल्लीः देशातील 6 राज्यांतील सात विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी उद्या म्हणजेच गुरुवारी मतदान होत आहे. यामध्ये बिहारमधील दोन, हरियाणा, तेलंगणा, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकांमध्ये आरजेडी नेते अनंत सिंग आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले कुलदीप बिश्नोई या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनंत सिंह यांची पत्नी नीलम देवी बिहारच्या मोकामा येथून नशीब आजमावत आहेत. तर कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा भव्य बिश्नोई हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून नशीब आजमावत आहे.

बिहारमध्ये मुख्य लढत होणार आहे ती, सत्ताधारी आरजेडी आणि विरोधी बाकावरील भाजपमध्ये आहे. त्याचबरोबर हरियाणात काँग्रेस आणि भाजपसोबत आम आदमी पार्टीही नशीब आजमावत आहे.

तर दुसरीकडे, महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

तेलंगणातील मुनुगोडा मतदारसंघातही सत्ताधारी टीआरएस आणि भाजपमध्येच काटे की टक्कर होणार आहे.

हरियाणातील आदमपूर विधानसभा मतदारसंघ गेल्या पाच दशकांपासून भजनलाल घराण्याचा बालेकिल्ला आहे. आणि तो कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते कुलदीप बिश्नोई यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपने त्यांचा मुलगा भव्य बिश्नोई यांना या जागेवरून उमेदवारी जाहीर केली आहे.

आदमपूर ही जागा 1968 पासून भजनलाल कुटुंबाकडे आहे. माजी मुख्यमंत्री भजनलाल यांनी नऊ वेळा, त्यांच्या पत्नी जस्मा देवी यांनी एकदा आणि कुलदीप बिश्नोई यांनी चार वेळा या जागेवरुन प्रतिनिधित्व केले आहे.

काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल आणि आम आदमी पार्टी यांनीही या पोटनिवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. बिहार विधानसभेच्या मोकामा आणि गोपालगंज या दोन जागांवरही उद्या मतदान होत आहे. भाजप आणि आरजेडी या दोन्ही पक्षांनी बाहुबली यांच्या पत्नीला मोकामा जागेसाठी उमेदवारी दिली आहे. तर मोकामामध्ये भाजपने अनंत सिंह यांना विरोध करणाऱ्या स्थानिक बाहुबली लालन सिंह यांची पत्नी सोनम देवी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून आरजेडीने अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांनाही उमेदवारी दिली आहे.

अनंत सिंह अपात्र झाल्यामुळे मोकामा येथे पोटनिवडणूक होत असून 4 वेळा भाजपचे आमदार राहलेले सुभाष सिंह यांच्या निधनामुळे गोपालगंज जागेवर पोटनिवडणूक होत आहे.

या जागेवरून भाजपने सुभाष सिंह यांच्या पत्नी कुसुम देवी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपची जातीय समीकरणे बिघडवण्यासाठी राजदने वैश समाजातील मोहन प्रकाश गुप्ता यांना तिकीट दिले आहे.

भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने महाराष्ट्रातील मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही केवळ औपचारिकता आहे. शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित आहे.

अंधेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने लटके यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. या वर्षीच्या मे महिन्यामध्ये, ऋतुजा लटके यांचे पती आणि शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी (पूर्व) च्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली.

सहा राज्यांत पोटनिवडणूक होत असलेल्या सात जागांपैकी भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी बीजेपी, शिवसेना आणि राजदला प्रत्येकी एक जागा मिळाली होती.

या जागांच्या निकालामुळे विधानसभेच्या स्थितीत कोणताही बदल होणार नाही. मात्र, राजकीय पक्षांनी हे हलके न घेता आक्रमक प्रचार केला होता. या निवडणुकीचा निकाल 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

तेलंगणातील मनुगोडे जागेची पोटनिवडणूक मुख्यमंत्री केसीआर यांचा पक्ष टीआरएससाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत पराभव झाल्यास राष्ट्रीय राजकारणात भूमिका बजावण्याच्या त्यांच्या मनसुब्याला मोठा धक्का बसणार आहे. त्याच वेळी, भाजप मात्र स्वतःचं अस्तित्व ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

या पोटनिवडणुकीत 47 उमेदवार रिंगणात आहेत पण मुख्य लढत राजगोपाल रेड्डी, माजी टीआरएस आमदार कुसुकुंतला प्रभाकर रेड्डी आणि काँग्रेसच्या पी श्रावंती यांच्यात होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खेरी जिल्ह्यातील गोला गोकरनाथ जागेवरही गुरुवारी मतदान होत आहे. भाजपचे आमदार अरविंद गिरी यांचे 6 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्यांची ही जागा रिक्त झाली होती.

या पोटनिवडणुकीत बसपा आणि काँग्रेसने आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यामुळे भाजपचे उमेदवार आणि दिवंगत आमदार अरविंद गिरी यांचे पुत्र अमन गिरी आणि पूर्वी याच जागेवरून आमदार असलेले सपाचे उमेदवार विनय तिवारी यांच्यात थेट लढत होणार असल्याचे दिसत आहे.

ओडिशाच्या धामनगर जागेच्या पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी बीजेडीने पाच उमेदवारांपैकी एकमेव महिला अबंती दास यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे आमदार चरण सेठी यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या जागेवरून भाजपने सेठी यांचे पुत्र सूर्यवंशी सूरज यांना उमेदवारी दिली आहे.

Non Stop LIVE Update
detail
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.