ODI World Cup 2023 : हे चार संघ पोहोचणार उपांत्य फेरीत! दिग्गज खेळाडूंने केलं भाकीत
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा यंदा भारतात असून दोन महिने शिल्लक आहेत. जेतेपदासाठी दहा संघ कसून सराव करत आहेत. या स्पर्धेत जेतेपद कोण पटकवणार? यासाठी काही दिग्गज खेळाडूंनी भाकीत वर्तवलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू ग्ले मॅग्रा याने चार संघांना पसंती दिली आहे.
1 / 6
भारतात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना गजविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या ठरलेल्या न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
2 / 6
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅग्रा याने चार संघांना पसंती दिली आहे. उपांत्य फेरीत चार संघ एकमेकांना भिडतील असं सांगितलं आहे.
3 / 6
उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. यातून दोन संघाची निवड अंतिम फेरीसाठी होणार आहे.
4 / 6
भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान हे चार संघ उपांत्य फेरीत धडक मारतील, असं माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅग्रा यांनी सांगितलं आहे. भारतातच वर्ल्डकप असल्याने यजमान संघाला फायदा होईल.पाकिस्तानचा संघ सध्या फॉर्मात आहे. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन संघही चांगली कामगिरी करत आहे.
5 / 6
मॅग्रा याने निवडलेले संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याचं स्पष्ट आहे. भारत आणि पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ दीर्घकाळापासून प्रतिस्पर्धी राहिले आहेत.
6 / 6
भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया, 14 ऑक्टोबरला पाकिस्तान आणि 29 ऑक्टोबरला इंग्लंडशी भिडणार आहे. दुसरीकडे, भारतीय संघातील अनेक खेळाडू अजूनही दुखापतींतून सावरत आहेत. स्पर्धेत पुनरागमन करतील की नाही याबाबत अजूनही शंका आहे.