Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 24 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. जीवनात अशक्य वाटणारी गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवल्याने आनंद द्विगुणित होईल. नातेवाईक, मित्र परिवार आनंदात सहभागी होईल. आनंदात कोणालाही दुखवून नका. शुभ अंक 5 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
आजचा दिवस रोजच्या प्रमाणे राहील. मनात कसली तरी भीती वाटत राहील. नामस्मरण करत राहा आणि कामावर लक्ष केंद्रीत करा. आरोग्य विषयक तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पिवळा राहील.
4 / 10
वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत काही कारणावरून वाद होऊ शकतो. पण वाद विकोपाला असं वागू नका. मुलांकडून चुकीचा प्रकार घडल्याने नाहक त्रास होईल. समजूत घालून प्रकरणातून बाहेर निघण्यास मदत करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
आज मनात विचारांचा काहूर माजलेला राहील. असं होईल की तसं होईल या प्रश्नांनी पुरते हैराण होऊन जाल. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. न घडणाऱ्या गोष्टींचा विचार करू नका. शुभ अंक 6 आणि शुभ रंग जांभळा राहील.
6 / 10
कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. बॉस खूश झाल्याने तुम्हाला पण दिलासा मिळेल. घरीही आनंदाचं वातावरण राहील. मुलांकडून गोड बातमी मिळू शकते. शुभ अंक 42 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
7 / 10
आज मानसिकरित्या एकदम सक्षम राहाल. घेतलेला निर्णय बरोबर मार्गी लागणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. जोडीदाराकडून पूर्ण साथ मिळेल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
8 / 10
आज पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. त्यामुळे छोट्या छोट्या कारणावरून जाब विचारू नका. कारण वादाने वाद वाढत जाईल. एकमेकांना समजून घेतल्यास प्रकरण शांत होईल. आई वडिलांची चांगली साथ मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
आज काही मोठ्या घडामोडी घडणार नाही. दिवस एकदम निवांत जाईल. एखादा निर्णय घेताना दहावेळा विचार करा. विनाकारण काही गोष्टींवर पैसे खर्च होतील. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
कुटुंबात काही कारणावरून वाद होतील. जागेचं प्रकरण डोकं वर काढेल. आरोपप्रत्यारोपामुळे न्यायालयाची पायरी चढावी लागू शकते. त्यामुळे योग्य सल्लामसलत करून पुढचं पाऊल उचला. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)