Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 25 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला हव्या असतात. हितशत्रूंकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर उद्योग धंद्यातील स्पर्धा तुमची डोकेदुखी वाढवेल. मेहनतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
आजचा दिवस चिंतेत जाईल. जे काम हाती घ्याल त्यातही अनेक अडचणी येतील. त्यामुळे दिवसभर चिडचिड होईल. त्यामुळे बोलून एखादा वाद ओढावून घेऊ नका. शुभ अंक 42 आणि शुभ रंग पिवळा राहील.
4 / 10
कायदेशीर प्रकरणात योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. कोणतंही जोखिमेचं काम हाती घेऊ नका. कुटुंबात कलहपूर्ण वातावरण राहील. जोडीदाराकडून नाहक त्रास होईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग निळा राहील.
5 / 10
आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. कारण मेहनत केल्याशिवाय अपेक्षित फळ मिळणार नाही. तसेच मेहनतीला दुसरा पर्याय देखील नाही. भौतिक सुखांसाठी उगाचच त्रागा करून घेऊ नका. शुभ अंक 6 आणि शुभ रंग हिरवा राहील.
6 / 10
आजचा दिवस एखादी चिंता तुम्हाला सतावत राहील. लांबचा प्रवास करणं शक्यतो टाळा. हेल्मेट किंवा सुरक्षेची सर्व साधने व्यवस्थितरित्या वापरा. जमल्यास आजचा दिवस कुटुंबासोबत व्यवस्थितरित्या घालवा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
7 / 10
आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देणारा दिवस आहे. त्यामुळे तुमची कामगिरी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. झालेल्या कामामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावलेला राहील. शुभ अंक 23 आणि शुभ रंग हिरवा राहील.
8 / 10
तुम्हाला तुमच्या परिश्रमाचं अपेक्षित फळ आज मिळेल. दिवस पूर्ण उत्साहवर्धक असणार आहे. काम पटकन आटोपल्याने डोक्यावरचा भार हलका होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
आजच्या दिवशी लक्ष ठेवून काम कराल. कारण एखादी चूक तुम्हाला महागात पडू शकते. कदाचित बॉसचा ओरडा ऐकावा लागू शकतो. तब्येतीकडे लक्ष द्याल. शुभ रंग 1 आणि शुभ रंग पिवळा राहील.
10 / 10
आजचा दिवसात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकते. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. तसेच अकारण पैसा खर्च होत असेल तर लगाम लावा. भविष्यात आर्थिक चणचण भासू शकते. शुभ अंक 8 आणि शुभ रंग तपकिरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)