Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 16 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कठोर परिश्रमाचं फळ हळूहळू मिळतं याची प्रचिती आज तुम्हाला मिळेल.घरातील काही वाद तुमच्या मध्यस्थीमुळे सुटतील. त्यामुळे त्रागा न करता तु्म्ही प्रश्न शांतपणे हाताळा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी असेल.
3 / 10
आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. त्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. विदेशात जाण्याचा योग जुळून येईल. पोटा संबंधित विकार डोकं वर काढतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
जीवनात आनंद मिळवण्यासाठी पैसा आवश्यक असतो. पण त्यासाठी कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. स्पर्धात्मक युग असल्याने आळस झटकून काम करावं लागेल. शुभ रंग 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.
5 / 10
आजचा दिवशी तुमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. मित्र आणि कुटुंबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणीही आनंदी वातावरण राहील. तुमच्या वागण्याने अनेक जण आकर्षित होतील. शुभ रंग 11 आणि शुभ रंग लाल राहील.
6 / 10
काही घडामोडी अशा घडतात की त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच वाढतो. असाच आजचा दिवस आहे. पण वास्तवापेक्षा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर फटका बसू शकतो. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
7 / 10
नोकरीच्या ठिकामी पदोन्नती किंवा पगारवाढीसंदर्भात गुड न्यूज मिळू शकते. त्यामुळे दिवसभर तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.
8 / 10
शत्रूपक्षाकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वाद घालण्यापेक्षा शांत राहण्याचा प्रयत्न करा. या काळात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होईल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
9 / 10
नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मानसन्मान हवा असेल तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवला पाहीजे. तर तुम्ही अपेक्षित यश मिळवू शकाल. विनाकारण कोणाशी वाद घालू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
10 / 10
काही प्रश्न कितीही केलं तरी सुटत नाहीत. त्यामुळे त्याच्या मागे लागून वेळ वाया घालवू नका. देवाची पूजा अर्चना करा आणि नकारात्मक दृष्टीकोन दूर करा. त्यामुळे आनंदी वाटू लागेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)