Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 15 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कोणतंही काम करताना आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. नेतृत्व सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे. लवकरत तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. शुभ अंक 7 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
भुतकाळात केलेली एक चूक तुम्हाला यावेळी महागात पडेल. त्यामुळे योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मानसिक तणाव या काळात येऊ शकतो. पण सामना करण्याची ताकद तुम्हाला मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील.
4 / 10
आज काम करताना तणाव येऊ शकतो. कदाचित बॉसच्या रोषाला सामोरं जावं लागेल. कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ येईल. त्यामुळे दिवसभर चिडचिड होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.
5 / 10
आर्थिक फटका बसल्याने दिवसभर तणावात राहाल. नवीन वस्तू खरेदी करताना दहावेळा विचार करा. खरंच गरज असेल तर ती वस्तू विकत घ्या. विवाहित जोडप्यांना त्रासाला सामोर जावं लागू शकते. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आज कुटुंबियांसोबत वेळ व्यतित कराल. त्यांच्या समस्या तुमच्या माध्यमातून सोडवल्या जातील. शब्द देण्यापूर्वी दहावेळा विचार करा. कारण आशेवर ठेवून काम न केल्यास नाव खराब होऊ शकतं. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल आहे.
7 / 10
शत्रूपक्षाकडून तुम्हाला आज त्रास होऊ शकतो. कामावर लक्ष केंद्रीत करा. कारण चुकीच्या निर्णयामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. संकटाच्या काळात बऱ्याच गोष्टी शिकता येतील. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
8 / 10
गेल्या काही दिवसात केलेल्या मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळेल. त्यामुळे दिवस आनंदीत जाईल. पण अति आत्मविश्वासात स्वकियांना दुखवू नका. पडत्या काळात मदत केल्याचं भान ठेवा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.
9 / 10
कधी कधी काही गोष्टी नकळत होऊन जातात. त्याबद्दल आपल्या मनात काहीही नसतं. त्यामुळे पश्चाताप करण्यापेक्षा मन शांत ठेवा. तुम्ही करत असलेली मेहनत वरिष्ठांच्या दृष्टीक्षेपात पडेल. त्यामुळे भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
10 / 10
आज ऑफिसमध्ये आनंदाची बातमी कानावर पडेल. तसेच आर्थिक गणित सुटल्याने गेल्या काही दिवसांपासून असलेलं टेन्शन दूर होईल. कुटुंबियांची चांगली साथ मिळेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)