Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 11 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेत चांगला राहील. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कोणतंही काम चुटकीसरशी पूर्ण कराल. डोकं शांत ठेवून काम करत राहा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी बरा राहील. काही ठिकाणी अडचणी जाणवतील. तर काही ठिकाणी फायदा होताना दिसेल. जागेसंबंधीची डील पूर्ण होताना दिसेल. शुभ अंक 1 आणि शुभ रंग निळा राहील.
4 / 10
यशाची गुरुकिल्ली ही तुमच्या हातात असते हे विसरू नका. थोड्या कारणांसाठी खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा. तुम्हाला निश्चितच यश मिळेल.वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग केसरी राहील.
5 / 10
आजचा दिवस थोडा त्रासदायक जाईल. वेळ काढून कुटुंबासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करा. मित्रांना भेटा आणि त्यांच्याशी बोला. त्यामुळे तुमचं टेन्शन हलकं होईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
नव्या विचारांसह नवी सुरुवात करा. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे लोकं आकर्षित होतील. पण तुमच्या चांगुलपणाचा कोणी फायदा उचलणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
7 / 10
मोठ्या कामात हात घालण्यापूर्वी वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. तुम्हाला तुमच्या अनुभवाचा कामात फायदा होईल. तुम्हाला फिरण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शुभ अंक 7 आणि शुभ रंग आकाशी निळा राहील.
8 / 10
आरोग्यविषयक तक्रारींमुळे आज त्रासदायक दिवस जाईल. तब्येतीची काळजी घ्या. रागाच्या भरात एखादा निर्णय घेणं टाळा. मित्रमंडळींचं सहकार्य लाभेल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. शुभ अंक 25 आणि शुभ रंग करडा राहील.
9 / 10
कुटुंबाप्रती आपलं प्रेम व्यक्त करा. त्यांना आपली काळजी असते हे विसरू नका. कधी संकट आलं की मदतीला तेच लोकं पहिल्यांदा धावत येतील. मुलांची काळजी घ्या. शुभ अंक 51 आणि शुभ रंग नारंगी राहील.
10 / 10
आजचा दिवस चांगला जाईल. संपूर्ण दिवस तुमच्या कामात व्यस्त राहाल. कामं मात्र वेळेतच पूर्ण कराल. आर्थिक गणितं सुटताना दिसतील. जोडीदाराशी प्रेमाने बोला. शुभ अंक 3 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)