Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 13 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस काही नवीन बातमी देणारा आहे. गेल्या काही दिवसापासून अडकलेली कामं आज पूर्ण होताना दिसतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबत काही कारणावरून वाद होऊ शकतो. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.
3 / 10
आजचा दिवस साधारण राहील. पण आपल्यातला अहंकार जागा होऊ देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. काही वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. प्रेम प्रकरणात काही अडचणी येऊ शकतात. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
4 / 10
आजचा दिवस काही खास नसेल. पण एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या. मानसिकरित्या आज तणाव जाणवेल. विनाकारण काळजी करू नका.हाती असलेला पैसा जपा. भविष्यात आर्थिक अडचण दूर होऊ शकते. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
आज वेगवेगळ्या विचारांचं मनात काहूर माजेल. काय करू काय नको असा संभ्रम निर्माण होईल. पण कामावर लक्ष केंद्रीत करा. लक्ष विचलीत होऊ देऊ नका. आरोग्य विषयक तक्रार जाणवू शकते. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या वाणीने समोरच्या व्यक्तींना प्रभावित कराल. काही कामं गोड बोलून पूर्ण होतील. घरातील खर्च वाढणार आहे. आईची तब्येत बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं राहील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील.
7 / 10
आज मानसिकरित्या एकदम स्वस्थ राहाल. त्यामुळे निर्णय घेताना कोणतीही अडचण येणार नाही. उत्पन्न वाढवण्यास या काळात मदत होईल. मेहनत घेतल्यास हाती दोन पैसे खेळते राहतील. मित्रांसोबत वाद होऊ शकतो. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.
8 / 10
आज काही संधी समोरून चालून येतील. त्या संधीचं सोनं करा. काही जण तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी देखील येतील. समाजात मानसन्मान वाढेल. तसेच कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. मुलांकडून चांगली बातमी कानावर पडेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग केसरी राहील.
9 / 10
आजचा दिवस प्रयत्नांना गती देण्याचा राहील. तेव्हाच कामात यश मिळेल हे लक्षात ठेवा. कुटुंबात काही कारणावरून वाद होऊ शकतात. मात्र विनाकारण शब्दाला शब्द वाढवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
10 / 10
कधी कधी दिलेला शब्द अंगाशी येतो. असाच आजचा दिवस असेल. काही जुनी प्रकरणं त्रासदायक ठरतील. न्यायालयीन प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. शुभ अंक 17 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)