G7 शिखर परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानमध्ये आहेत. ते सध्या हिरोशिमामध्ये आहेत. तिथे त्यांनी फुमिया किशिदा यांची भेट घेतली. G7 शिखर परिषद आणि इतर विषयांवर यावेळी चर्चा झाली.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक यौल यांची भेट घेतली. या भेटीत आयटी, तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर्स यासह नव्या उपक्रमांविषयी चर्चा झाली.
व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. दोन्ही देशातील संबंध आणि आगामी धोरणांवर या भेटीत चर्चा झाली.
जर्मनचे चान्सलर ओलाफ शोल्त्स यांचीही मोदींनी भेट घेतली. माझे मित्र ओलाफ शोल्त्स यांची भेटीने आनंद झाला, असं म्हणत मोदींनी फोटो शेअर केला आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्र्ध्यक्ष जोको विडोडो आणि इरियाना विडोडो यांची भेट घेतली. यावेळी भारत इंडोनेशिया संबंध अधिक दृध कसे होतील, यावर चर्चा झाली.