G-20 परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘G-20 समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली आहे.
‘G-20 समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेत राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला.
G-20 परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
जुहू बिचची नियमितपणे स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसंच उपस्थित नागरिकांकडून हा बिच स्वच्छ आणि सुंदर असतो किंवा नाही तेही जाणून घेतलं, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
केंद्रीय पर्यावरण आणि वने मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, प्रधान सचिव प्रविण दराडे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि G-20परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.