अभिनेत्री प्रिया बापट ही कायम हसरी दिसते. प्रिया कायम एवढी हसरी कशी असते? तिच्या या आनंदाचं कारण काय? असा अनेकांना प्रश्न पडतो.
प्रिया बापटने तिच्या हास्याचं आणि आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांचा सामना कसं करते त्याचं उत्तर एका पोस्टमधून दिलं आहे.
तुमच्या आयुष्यात विचित्रपणा, विक्षिप्तपणा आला असेल तर मस्त पोज द्या आणि फोटो काढा, असं कॅप्शन देत प्रियाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
प्रियाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. अनेकांनी तिचे हे फोटो लाईक केले आहेत.
प्रिया बापटची सिटी ऑफ ड्रिम्स ही वेबसिरीजचा तिसरा भाग 26 मे म्हणजेच उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्त प्रियाने हा फोटो शेअर केला आहे.