बंगळुरु : कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण ( Karnataka CM ) असा प्रश्न आता कर्नाटकच्या जनतेला पडला आहे. काँग्रेसने बहुमत मिळवल्यानंतर आज काँग्रेसची बंगळुरू येथे विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित होणार आहे. पण त्याआधीच डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांचे समर्थक कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहेत. डीके शिवकुमार ( DK Shivkumar ) यांचे समर्थक त्यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानाबाहेर जमले आणि डीके शिवकुमार मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत’ अशा घोषणा देऊ लागले.
कर्नाटकात काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवकुमार यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्रीपदावरुन त्यांच्यात आणि सिद्धरामय्या ( siddaramaiah ) यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ते म्हणाले की, मी पक्षासाठी अनेक त्याग केले आहेत आणि सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. मी सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला आहे.
शिवकुमार यांनी तुमकूरमधील नूनविंकरे येथील श्री कादसिद्धेश्वर मठाला भेट दिली. नंतर त्यांनी आपल्या कुटुंबासह श्री करीबसवांच्या मंदिरात विशेष पूजेला हजेरी लावली. ते म्हणाले, “हे मठ माझ्यासाठी पवित्र स्थान आहे.
इन्कम टॅक्सचे छापे पडले तेव्हाही स्वामीजींनी मला पूर्ण मार्गदर्शन केले. मी 134 जागा मागितल्या आणि मला त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या.” शिवकुमार हे गांधी घराण्याचे निष्ठावंत आहेत आणि ते पक्षासाठी समस्यानिवारक मानले जातात. ते आठ वेळा आमदार राहिले आहेत. 2002 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव यांच्या विरोधात विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
काँग्रेस पक्षाचे संकटमोचक म्हणून डी.के शिवकुमार यांच्याकडे पाहिलं जातं. 2002 मध्ये महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले होते. यावेळी सर्व काँग्रेस आमदारांना बंगळुरुला आणले आणले होते. हे सर्व 4o काँग्रेस आमदार डीके शिवकुमार यांच्या देखरेखीखाली ईगलटन रिसॉर्टमध्ये होते. त्यामुळे सरकार वाचलं होतं.