भारतातील 5 सर्वात सुंदर आणि उंच धबधबे!

| Updated on: Jul 31, 2023 | 1:21 PM

दऱ्या, ओढे, नद्या, पूल, धबधबे या सर्व गोष्टी सौंदर्यात भर घालतात. भारतातील धबधबे त्यांच्या चित्तथरारक सौंदर्यासाठी ओळखले जातात आणि म्हणूनच आपण त्यांना आपल्या बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. चला बघुयात भारतातील ५ सर्वात उंच धबधबे! वाचा आणि आयुष्यात एकदा तरी भेट द्या.

भारतातील 5 सर्वात सुंदर आणि उंच धबधबे!
highest waterfall in india
Follow us on

मुंबई: पावसाळा आला की आपल्याला आठवतो तो धबधबा! प्रेम, चहा, भजी आणि धबधबा! आपली इच्छा होते की आपण मस्त एखाद्या धबधब्याखाली जाऊन मजा करावी, पाण्याचा आनंद घ्यावा. मग शोध सुरु होतो, कुठे जायचं फिरायला? भारतात अशी अनेक अनेक ठिकाणं आहेत. भारत विविधतेने नटलेला देश आहे ज्यात फक्त संस्कृतीतच विविधता नाही तर निसर्गात सुद्धा विविधता आहे. दऱ्या, ओढे, नद्या, पूल, धबधबे या सर्व गोष्टी सौंदर्यात भर घालतात. भारतातील धबधबे त्यांच्या चित्तथरारक सौंदर्यासाठी ओळखले जातात आणि म्हणूनच आपण त्यांना आपल्या बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. चला बघुयात भारतातील ५ सर्वात उंच धबधबे! वाचा आणि आयुष्यात एकदा तरी भेट द्या.

1. वझराई धबधबा, महाराष्ट्र

वझराई धबधबा, हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. हे एक भक्तीस्थान म्हणून ओळखले जाते आणि निसर्गाच्या कुशीत हे एक उत्तम ठिकाण आहे. या धबधब्याची उंची १८४० फूट (५६० मी.) आहे.

2. कुंचिकल धबधबा, कर्नाटक

कुंचिकल धबधबा हा कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील मास्तिकट्टेजवळील निदागोडू गावात असलेला सर्वात उंच धबधबा आहे. वर्ल्ड वॉटरफॉल डेटाबेसनुसार हा धबधबा ४४५ मीटर (१४९३ फूट) उंचीवरून पडतो.

3. बरेहीपानी धबधबा, ओडिशा

बरेहीपाणी धबधबा भारताच्या ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात आहे. पूर्व घाटातील मेघासनी पर्वतावरून वाहणाऱ्या बुधबलंगा नदीवर हा धबधबा आहे. याची एकूण उंची ३९९ मीटर (१,३०९ फूट) असून हा देशातील दुसरा सर्वात उंच धबधबा आहे.

4. नोहकालीकाई धबधबा, मेघालय

हा धबधबा मेघालय राज्यात स्थित आहे आणि पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानला जातो. हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा असून तो ११०० फूट उंचीचा धबधबा आहे. मेघालय राज्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे नोहकालीकाई धबधबा आणि पर्यटकांसाठी चित्तथरारक आहे.

5. दूधसागर धबधबा, गोवा

हा भारताच्या गोवा राज्यातील मांडवी नदीवर असलेला धबधबा आहे. हा देशातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे आणि सुंदर पश्चिम घाटाने वेढलेला आहे. हा धबधबा ३१० मीटर (१०१७ फूट) उंचीवरून आणि सरासरी रुंदी ३० मीटर (१०० फूट) वरून पडतो.